लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच बदाम फायदेशीर आहे. बदाम उष्ण असतात त्यामुळे लोक हिवाळ्यात जास्त प्रमाणात याचे सेवन करतात. बदामामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि ओमेगा-३ सारखी फॅटी ॲसिड असते, जे हिवाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर असते. आहारतज्ञ नमामी अग्रवाल सांगतात की हिवाळ्यात बदाम खाण्याची योग्य पद्धत जाणून घेतली पाहिजे. तरच आरोग्याला त्याचा फायदा होतो. बदामामध्ये फायटिक ॲसिड असते. त्यामुळे ते खाणे आरोग्याच्या अनेक परिस्थितीमध्ये हानिकारक ठरू शकते. यामुळेच भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर ठरते. पण हिवाळ्यात किती बदाम खावेत हे देखील महत्त्वाचं आहे. जाणून घेऊया रोज किती बदाम खाणे योग्य आहे?
हिवाळ्यात दररोज पाच ते दहा बदाम खाणे फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीर उबदार राहते आणि ऊर्जा ही मिळते. असं तज्ञांचा मत आहे यापेक्षा जास्त बदाम खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढू शकते. त्यामुळे लठ्ठपणा येण्याची शक्यता असते.
भिजवून खाणे: बदाम खाण्याच्या सर्वोत्तम मार्ग म्हणजे रात्रभर पाण्यात बदाम भिजवून ठेवून ते खाणे. यामुळे शरीरातील पचन संस्था सुधारते आणि पचनासही मदत होते. बदाम भिजवून खाल्ल्याने त्याचा आरोग्यावर कोणताही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही.
सकाळी रिकाम्या पोटी: बदाम खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी सकाळी शरीराला अधिक ऊर्जेची गरज असते. त्यामुळे सकाळी बदाम खाल्ल्याने शरीर दिवसभर सक्रिय राहते.
बदामाचे दूध: दुधात उकळून बदाम खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीराला अतिरिक्त कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात.
बदामा मध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असते. जे हृदयासाठी फायदेशीर असतात. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. बदामामध्ये बायोटिन आणि व्हिटॅमिन ई असते जे त्वचेला आर्द्रता देतात आणि केस निरोगी ठेवतात. हे खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली राहते.