Parineeti Chopra ने कसं कमी केलं 28 किलो वजन? टिप्स फॉलो करून तुम्हीही होऊ शकता Fat To Fit

| Updated on: May 14, 2023 | 1:23 PM

एकेकाळी तिने तिचे वजन 28 किलोपर्यंत कमी केले होते. आपणही तिची जर जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी पाळल्या तर आपल्यालाही इच्छित परिणाम साधता येऊ शकतात.

Parineeti Chopra ने कसं कमी केलं 28 किलो वजन? टिप्स फॉलो करून तुम्हीही होऊ शकता Fat To Fit
Parineeti chopra weight loss
Follow us on

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने 13 मे च्या रात्री आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढासोबत साखरपुडा केला. हे दोन्ही सेलिब्रिटी अनेक आठवड्यांपासून एकत्र स्पॉट केले जात होते, ज्याबद्दल सतत चर्चा होत होती. परिणीतीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे. पण त्यासाठी तिला मोठ्या कसोटीला सामोरे जावे लागले. एकेकाळी तिने तिचे वजन 28 किलोपर्यंत कमी केले होते. आपणही तिची जर जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी पाळल्या तर आपल्यालाही इच्छित परिणाम साधता येऊ शकतात.

परिणीतीने कसे कमी केले वजन?

  1. कडक आहार : निरोगी आहाराच्या सवयीचा अवलंब केल्याशिवाय आपण तंदुरुस्ती मिळवू शकत नाही. परिणीती चोप्रा अतिशय कडक डाएट रूटीन फॉलो करत असे. चरबी, उच्च कार्ब आणि गोड गोष्टींपासून तिने स्वत: ला दूर ठेवले होते. विशेषतः पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राईज ती खात नाही.
  2. परिणीती चोप्रा आपल्या ब्रेकफास्टमध्ये ब्राऊन ब्रेड, बटर, अंड्याचा पांढरा भाग, एक ग्लास दूध आणि ताज्या फळांचा रस खात असे. हेल्दी ब्रेकफास्टमुळे वजन नियंत्रणात राहते.
  3. परिणीती चोप्राला दुपारच्या जेवणात ब्राऊन राईस, ब्रेड, डाळ आणि हिरव्या पालेभाज्या खायला आवडतात. वजन कमी करण्यासाठी हलका आहार अत्यंत प्रभावी ठरतो
  4. परिणीती चोप्रा रात्री झोपण्यापूर्वी 4 तास आधी जेवण करायची. ज्यात कमी तेलात बनवलेले अन्न, हिरव्या भाज्या आणि एक ग्लास दुधाचा समावेश आहे.
  5. डाएट कंट्रोलसोबतच परिणीती व्यायामावरही खूप भर देते. ती अनेकदा जिमच्या बाहेर स्पॉट होते. अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर वर्कआउट व्हिडिओ देखील शेअर करते. ती योगा आणि मेडिटेशनचाही आधार घेते.