How to Control Diabetes : व्यस्त दिनचर्या, खराब जीवनशैली, वाढते ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे (bad lifestyle, stress) आजकाल अनेक लोकांमध्ये वेगवेगळे आजार होण्याचा (health problems) धोका वाढला आहे. त्यापैकीच एक आजार म्हणजे मधुमेह (diabetes). रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे मधुमेह होतो. अशा परिस्थितीत सतत लघवी लागणे, जास्त भूक लागणे, घाम येणे, बेचैन वाटणे अशी अनेक लक्षणे दिसू शकतात. एवढंच नव्हे तर मधुमेह हा गंभीर हृदयरोगासाठीही कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजलाच मधुमेहाला आळा घालता आला, तर आपले शरीर अनेक आजारांपासून वाचू शकते. पण मधुमेहाला आळा घालायचा म्हणजे नक्की काय करायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? काही पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे (sugar level) प्रमाण नियंत्रणात राहते. जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते.
जांभूळाच्या बिया –
जांभूळाच्या बिया हा मधुमेहावरील एक उपाय आहे. बरेचसे लोक रक्तातील साखर वाढल्यानंतर घरगुती उपाय म्हणून जांभूळाच्या बियांचा वापर करताना दिसतात. मधुमेहाला आळा घालण्यासाठी तुम्ही जांभूळाच्या बियांचे सेवन करू शकता. त्यासाठी जांभूळाच्या बिया थोड्या वाळवून त्याची पावडर करून ठेवावी. रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाण्यासह या पावडरीचे सेवन करावे.
मेथीचे दाणे –
मेथी दाण्यांचे सेवन केल्यानेही मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. रोज मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. त्याससाठी रोज रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे भिजवून ठेवावे. सकाळी उठल्यावर अंशपोटी हे पाणी प्यावे. त्यातील भिजवलेले मेथीचे दाणे तुम्ही चावूनही खाऊ शकता. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
लसूण –
लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. मधुमेहाचे रुग्ण रक्तदाब कमी करण्यासाठी व शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी लसूण सेवन करू शकतात. त्यासाठी लसणाच्या 2-3 पाकळ्या घेऊन, त्या सोलून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात. सकाळी रिकाम्या पोटी लसूण चावून खावे. त्यामुळे मधुमेहाला आळा बसतो. लसणामुळे हाय कोलेस्ट्रॉलही कमी होण्यास मदत मिळते.
कोरफड –
कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. ती केवळ त्वचा आणि केसांसाठीच उपयोगी नाही, तर त्याच्या सेवनामुळे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही कोरफडीचे सेवन फायदेशीर ठरते. कोरफडीचा रस पिऊन तुम्ही मधुमेह नियंत्रित करू शकता. कोरफडीचा ज्यूस तयार करण्यासाठी कोरफडीचे पान कापून एका त्यातील रस काढून घ्यावा. त्यामध्ये पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. त्यानंतर त्याचे सेवन करावे.
आवळा –
आवळ्यामध्ये अनेक पोषक तत्वे आणि औषधी गुणधर्म असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. तसेच हायपोग्लायसेमिक गुणधर्मही असतात. त्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल होऊ शकते. आवळ्याची पावडर कोमट पाण्यात मिसळून तुम्ही त्याचे सेवन करू शकता. त्याचे रोज, नियमितपणे सेवन केल्यास मधुमेहाला आळा घालण्यास मदत होते.
तसेच कडुनिंब, कारलं, काकडी, दालचिनी, नाचणीचे पीठ आणि अंजीराची पाने खाल्यानेही मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांचे सेवन करावे.
( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )