लूज मोशन किंवा अतिसार झाल्यास काय उपाय करावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण, या अतिसारामुळे अशक्तपणा येतो. आजकाल आजारी पडल्यावर पोटाच्या समस्या उद्भवतात, त्यापैकी एक म्हणजे अचानक अतिसार होणे. यामुळे आपल्याला अशक्तपणा येतो.
लूज मोशन किंवा अतिसार झाल्यास पोटात दुखणे आणि शरीरात अशक्तपणा येतो. मात्र अशा वेळी तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नये, कारण अनेक घरगुती उपायांच्या मदतीने या समस्येपासून सुटका मिळू शकते.
अतिसार म्हणजे जेव्हा आपल्याला एका दिवसात 3 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस शौचाला गेले की त्याला अतिसार असं म्हणतात. आपल्याला अतिसार झाला असेल तर आपल्या आतड्यांसंबंधी हालचालींचे प्रमाण बदलते, पाणी कमी होते. अतिसाराची ईजा ही पोटात उद्भवते आणि काही दिवसात स्वतःच साफ होते. तथापि, अतिसाराची इतरही अनेक कारणे आहेत. बहुतेक अतिसार सौम्य असतो, तर अनेकदा तुम्हाला यामुळे रुग्णालयातही जावे लागू शकते.
औषधे न घेता लूज मोशनच्या समस्येवर मात करायची असेल तर तुम्ही आजीच्या काळातील अनेक उपायांचा अवलंब करू शकता, आशा आहे की लवकरच आराम मिळेल.
अतिसार झाला की त्यासोबत शरीरात पाण्याची कमतरता भासते, त्यामुळे शरीर हायड्रेटेड ठेवणे आवश्यक ठरते. यासाठी एक लिटर पाण्यात 5 चमचे साखर आणि थोडे मीठ मिसळावे. हे दिवसातून एकदा प्या.
ओवा हा एक मसाला आहे जो पोटासाठी खूप फायदेशीर मानला जातो. मंद आचेवर कढईवर 15 मिनिटे थोडीशी ओवा तळून घ्या आणि पाण्याबरोबर सेवन करा. ओवा ही औषधी वनस्पती आहे. ओव्याच्या झाडाची पाने पिसासारखी असतात आणि फळे फिकट गुलाबी-खाकी रंगाची असतात. ओव्याचा वापर मसाला म्हणून केला जातो आणि त्याच्या औषधी गुणधर्मांसाठीही त्याचा वापर केला जातो. प्रतिजैविक गुणधर्म असतात, जे त्वचेच्या विविध संक्रमणांवर उपचार करण्यात मदत करू शकतात.
अतिसाराच्या वेळी पचनक्रियेत त्रास होईल अशा कोणत्याही गोष्टी खाऊ नयेत, फळांचा रस, नारळ पाणी यांसह जास्तीत जास्त हलके द्रव पदार्थ घ्यावेत.
मीठ आणि लिंबू यांचे मिश्रण शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म पोटाला आराम देतात.
दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, कारण हे प्रीबायोटिक फूड पोट थंड करते, ज्यामुळे अतिसाराची समस्या दूर होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)