मुंबई: अनेकदा लोकांना सकाळी उठून मानेला वेदना किंवा जडपणा जाणवतो, ज्यामुळे त्यांना मान नीट वाकवता येत नाही किंवा हालचालही करता येत नाही. याशिवाय काही लोकांना चक्कर येण्याची समस्याही जाणवते. ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामावर परिणाम होऊ शकतो. यामागील कारण चुकीचे झोपणे किंवा उशीचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे असू शकते. बरेचदा आपल्याला उशी घेई नका असाही सल्ला दिला जातो. उठल्या उठल्याच आपली मान दुखायला लागते. अशावेळी काही सोप्या पद्धतींचा अवलंब केल्यास या समस्येवर मात करता येऊ शकते.
मानदुखीपासून सुटका कशी मिळवायची?
- अनेकदा सकाळी उठल्यानंतर लोकांना मानदुखीच्या होते. या दुखण्यामुळे दिवस खराब जाऊ शकतो. चला जाणून घेऊया या दुखण्यावर कोणत्या प्रकारे मात करता येईल.
- जर तुमची मान खूप दुखत असेल तर तुम्ही प्रभावित भागावर आईस पॅक किंवा थंड पाणी लावू शकता. असे केल्याने मानेच्या स्नायूंची सूज दूर होऊ शकते.
- मानदुखी कमी करण्यासाठी हीट पॅकचा देखील तुम्ही वापर करू शकता. हीट पॅकने मानेच्या स्नायूंच्या दुखण्यावर मात करता येते.
- हलक्या हातांनी मानेची मालिश केल्याने मानेचा कडकपणा दूर होतो शिवाय स्नायूंच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो. अशावेळी तुम्ही मसाजसाठी मोहरीचे तेल, खोबरेल तेल वापरू शकता याव्यतिरिक्त तिळाच्या तेलाचाही वापर करू शकता.
- मानदुखी टाळण्यासाठी पोटावर झोपणे टाळावे. आपण एका कुशीवर देखील झोपू शकता.
- मानदुखी काहीही केल्या थांबत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. कदाचित झोपेमुळे मानेच्या नसावर दबाव येत असेल, ज्यामुळे हे दुखणे होत असेल.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)