how to eat curd during winter: आपल्या पैकी अनेकांना रोजच्या आहारात दह्याचे सेवन करायला आवडते. अश्या लोकांचे दह्याशिवाय अन्न अपूर्ण राहते. दही हे चवीसोबतच आपल्या आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर मानली जाते. दही एक निरोगी प्रोबायोटिक आहे जे उच्च प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेले उत्तम स्रोत आहे. दह्यापासून तुम्ही अनेक पदार्थ बनवून खाऊ शकता. पण तुम्हाला माहित आहे का हिवाळ्यात दही खाऊन तुम्ही व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता कशी भरून काढू शकता?
यावेळी दिल्लीच्या श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या चीफ डायटीशियन प्रिया पालीवाल सांगतात की, आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन बी 12 जितकं महत्त्वाचं आहे, तेवढ्याच लोकांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण झाली आहे. विशेषत: जी लोकं फक्त शाकाहारी पदार्थ खातात त्यांच्यात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दिसून येते. परंतु प्रोबायोटिक्ससमृद्ध दहीसह तुम्ही काही गोष्टी खाल्ल्याने व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर होऊ शकते.
डायटीशियन प्रिया पालीवाल सांगतात की, दह्याच्या सेवनाने तुमची पचनक्रिया सुधारते तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. याव्यतिरिक्त, दहीमध्ये व्हिटॅमिन बी 12 असते, जे मेंदू, मज्जातंतू आणि लाल रक्त पेशींसाठी खूप महत्वाचे आहे. मात्र हिवाळाच्या दिवसांमध्ये दह्याचे सेवन नीट करणे गरजेचं आहे जेणेकरून त्याचा फायदा तुमच्या शरीराला होऊ शकेल.
थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही दह्यासोबत गुळाचे सेवन करू शकता. कारण हिवाळ्यात गूळ आणि दही यांच्या मिश्रणाने शरीराला उष्णता मिळते आणि बी 12 सोबतच लोहाची कमतरताही पूर्ण भरून निघते. याशिवाय अक्रोड, बदाम आणि किसलेले चीज हे पदार्थ दह्यात मिसळून पाहू शकता, यात व्हिटॅमिन बी 12 आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही जर ब्रेकफास्टमध्ये गरमागरम पराठ्यांसोबत दही खाल्ल्याने पोट हलके राहते आणि शरीराला आवश्यक पोषण मिळते.
थंडीच्या दिवसात तुम्हाला दही खायचे असल्यास यात तुम्ही साखर, मध, गूळ आणि मीठ किंवा काळे मीठ घालून केव्हाही खाऊ शकतात. कारण यात हे पदार्थ मिक्स केल्याने दह्यातील शकफ निर्माण करणारे गुणधर्म कमी होतात. तज्ञांनुसार तुम्ही जेव्हा रायता तयार करता तेव्हा त्यात पुदिना आणि जिरे पूड टाकल्यास चव आणि पोषण वाढते. या सर्व पद्धतींपैकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारे दही खाऊ शकता. दही थंड आहे हे लक्षात ठेवा, त्यामुळे दिवसा खा आणि रात्री खाणे टाळा.