मुंबई: विनाकारण खाणे आणि झोपणे आणि शारीरिक हालचाली कमी करणे यामुळे आता शरीरावर विपरीत परिणाम दिसू लागले आहेत. यामुळे लोकांना लठ्ठपणा, गॅस-ॲसिडिटी, मधुमेह, हाय बीपी आणि हार्ट अटॅक सारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. पोट निरोगी ठेवलं तर वाढत्या वजनासह सर्व आजारांवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवता येऊ शकतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात कोशिंबीर म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या काकडीच्या अशा अनेक आयुर्वेदिक गुणधर्मांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमचे शरीर स्लिम-ट्रिम बनवू शकता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते काकडीत अँटी डायबेटिक आणि अँटी ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच लिपिड कमी करण्याचे गुणधर्मही यात आढळतात. काकडीचे सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन सी, के आणि इतर पोषक तत्वे देखील मिळतात. ज्यामुळे आपलं आरोग्य निरोगी राहतं. चला तर मग जाणून घेऊया शरीरातील चरबी कमी करण्यासाठी काकडी कशी उपयोगी येते.
जर तुम्हाला तुमच्या शरीरावरील चरबी कमी करायची असेल तर तुम्ही कोशिंबीर म्हणून दररोज सकाळ-संध्याकाळ काकडी खाऊ शकता. भाकरी-भाजी किंवा डाळ-भाताबरोबर काकडी खाल्ल्याने पोट लवकर भरते. हे सहज पचते, जेणेकरून शरीरातील चरबी वाढण्याची समस्या उद्भवत नाही.
काकडी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे गॅस-अॅसिडिटी दूर होते तसेच पोट फुगण्याची समस्या ही दूर होते.
ज्यांना बद्धकोष्ठतेची तक्रार आहे, त्यांच्यासाठी काकडी खाल्ल्याने बरेच फायदे होतात. खरं तर यात फायबर भरपूर प्रमाणात आढळतं, ज्यामुळे पोटाचं चयापचय मजबूत होतं. यात भरपूर पाणी असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही,
शरीरातील चरबी वाढवण्यात साखर महत्त्वाची भूमिका बजावते. पण काकडीमध्ये नगण्य नैसर्गिक साखर असते, जी भरपूर खाऊनही शरीरातील चरबी वाढवत नाही. हे लो कॅलरीफूड आहे, त्यामुळे आपण आपल्या आहारात काकडीचा समावेश करून आरोग्य बनवू शकता.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)