मुंबई: सकाळ-संध्याकाळ प्रत्येकाच्या घरी चपाती बनवली जाते, पण आपण खात असलेली चपाती आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे की नाही. हे कदाचित कुणालाच माहित नसेल. आणखी यात एक अशी गोष्ट आहे की चपात्या बनवायची पद्धत. चपात्या बनवताना त्या जर थेट गॅसवर भाजल्या तर त्या कितपत आरोग्यासाठी फायदेशीर आहेत? त्याबद्दल कुणालाच माहिती नाही. चपाती कुरकुरीत करण्यासाठी घरातील स्त्रिया थेट गॅसच्या आचेवर चपात्या भाजतात. यामुळे चपात्या लवकर भाजल्या जातात आणि त्यांना कुरकुरीतपणाही येतो, परंतु अशा पद्धतीनं भाजल्या जाणाऱ्या चपात्या आपलं किती नुकसान करतात याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला चपात्या भाजण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. पद्धती तुम्हाला माहितीच आहेत पण आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारी पद्धत सांगणार आहोत.
एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, चपाती भाजल्याने वायू प्रदूषक बाहेर पडतात, ज्याला डब्ल्यूएचओने हानिकारक असल्याचं सांगितलं आहे. कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साईड असे या वायूचे नाव आहे.
न्यूझीलंडचे शास्त्रज्ञ डॉ. पॉल ब्रेंट यांनी प्रकाशित केलेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की जेव्हा स्त्रिया घाईघाईत थेट गॅसच्या आचेवर चपात्या भाजतात तेव्हा चपाती कार्सिनोजेनिक रसायन उत्सर्जित करते जे चपात्या बनवणाऱ्या स्त्रीच्या शरीरात जाते. हे रसायन अत्यंत हानिकारक असते.
खरंतर यावर सध्या अधिक संशोधन सुरू आहे, पण आतापर्यंत झालेले सर्व संशोधन पाहता थेट गॅसच्या आचेवर चपात्या भाजल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ल्यानुसार गॅसवर तवा ठेवून त्यावर चपाती भाजणे कधीही योग्यच!