कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढायला सुरूवात झाली आहे. या आजाराचे मुख्य लक्षण आहे सर्दी-खोकला (cough and cold). हे आजार कोणत्याही ऋतूत आणि महिन्यात सामान्यतत: होतच असतात. विशेषत: पावसाळ्यात (rainy season) सर्दी-खोकल्याच्या रुग्णांचे प्रमाण खूप वाढते. हे अनेक संसर्गांशी जोडलेले असते. जेव्हा शरीराची रोगप्रतिकारकक्षमता कमी होते, तेव्हा सर्दी, खोकला आणि तााप येण्याचा धोका वाढतो. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता. तसेच रोगप्रतिकारक क्षमताही (immunity) वाढवणे महत्वाचे असते. ओवा हे एक आयुर्वेदिक औषध आहे. आपल्या सर्वांच्या घरात ओवा (carrom seeds)असतोच. पोटदुखीचा, गॅसेसचा त्रास झाला तर ओवा आणि मीठ चावून खायला सांगतात. सर्दी-खोकल्यापासून आराम हवा असेल तर ओव्याचा काढा प्या.
गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय स्वयंपाकघरात ओव्याचा उपयोग हमखास होतोच. ओव्याच्या बियांमध्ये एक वेगळा तिखट स्वाद, चव असते. त्याचा उपयोग लोणचं, भाजी आणि पराठ्यांची चव वाढवण्यासाठी केला जातो. ओव्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तसेच ओव्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमताही वाढते.
ओव्यामध्ये ॲंटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात, जे फ्री रेडियल ॲक्टिव्हिटी थांबवण्यास मदत करतात. तसेच ओव्यामध्ये ॲंटी-बॅक्टेरिअल गुणधर्मही असतात, जे ऋतुमानानुसार होणाऱ्या संसर्गापासून शरीराचे रक्षण करतात. थंडी, बंद नाक आणि छातीमध्ये कफ झाल्यामुळे होणारा त्रास, ओव्याच्या काढ्याच्या सेवनामुळे कमी होतो.
2 चमचे ओवा, तुळशीची पाने, 1 छोटा चमचा काळी मिरी, 1 चमचा मध, पाणी .
( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )