How to manage your stress
Image Credit source: Social Media
मुंबई: आपण बऱ्याचदा तणावात असतो आणि आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे तणावाची पातळी वाढू शकते. जर दैनंदिन ताण तणाव सावधगिरीने आणि वेळेच्या व्यवस्थापनाने हाताळता आला तर आयुष्य जगायला सोपं होईल नाही? आपल्या आयुष्यात अशा काही अनपेक्षित नकारात्मक घटना घडतात ज्या आपल्याला दु:खात, धक्क्यात किंवा तणावात टाकतात. अशा वेळी स्वतः ताणतणावात असताना, स्ट्रेसला सामोरे जाताना स्वत:ला थोडी विश्रांती दिली पाहिजे आणि आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी काही सेल्फ केअर टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. आज तणावाच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तणावाच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी
- नियमित व्यायामुळे शरीरात एंडोर्फिन नावाचे हार्मोन तयार होते ज्यामुळे तणाव कमी होतो. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.
- तणावाच्या काळात जंक फूड खाणे टाळा आणि जीवनसत्त्वे आणि खनिजयुक्त पदार्थांचे सेवन करा. जेवणात हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी आणि दूध असे पदार्थ जास्तीत जास्त खा.
- वेळेच्या व्यवस्थापनाचा विचार करा, तणाव कमी करण्यासाठी नियमितपणे काम करा.
- झोप आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाची आहे. तणावाच्या काळात उशीरा उठणे किंवा लवकर उठून सर्व काही करून पाहणे मोहक ठरू शकते. तथापि, तणावाची पातळी कमी करण्यासाठी आणि आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.
- आपले कुटुंब आणि मित्रांसह वेळ घालवा आणि त्यांच्याशी स्वत: बद्दल बोला. यामुळे तुमचे मन त्यांच्याशी बोलण्यास व्यस्त राहील आणि तुमचा ताण दूर होईल. इतकंच नाही तर कुटुंबातील सदस्य आणि मित्र-मैत्रिणी तुमचा ताण कमी करण्यास मदत करतील.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)