वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये या गोष्टींचा समावेश करा

| Updated on: Apr 01, 2023 | 6:23 PM

जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर काळजी करण्याची गरज नाही, उलट तुम्हाला डाएटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. होय, ब्रेकफास्टमध्ये काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता.

वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये या गोष्टींचा समावेश करा
Breakfast menu
Image Credit source: Social Media
Follow us on

आजकाल लोक आपल्या वाढत्या वजनामुळे जास्त त्रस्त असतात. कारण उन्हाळ्याच्या ऋतूत लोकांचं वजन झपाट्याने वाढू लागतं. त्याचबरोबर उन्हाळ्यात आपण अशा अनेक ड्रिंक्सचा आधार घेतो जे वजन वाढवण्याचं काम करतात. उन्हाळ्यात वजन कसं कमी करायचं याचा विचार अनेकदा लोक करतात. पण जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर काळजी करण्याची गरज नाही, उलट तुम्हाला डाएटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. होय, ब्रेकफास्टमध्ये काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता.

ब्रेकफास्टमध्ये या गोष्टींचा समावेश करा

अंडी

अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यात सोडियम, पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात असते जे दिवसभर आपल्या शरीराला ऊर्जा देते. त्याचबरोबर सकाळी ब्रेकफास्टमध्ये अंडी खाल्ल्यास जास्त वेळ भूक लागत नाही आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहते. यासाठी तुम्ही अंडी उकडून खाऊ शकता.

ग्रीन टी

ग्रीन टी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हे प्यायल्याने पोटाची चरबी कमी करणे सोपे जाते. यासोबतच तणावही दूर होतो. त्याचबरोबर ग्रीन टी प्यायल्याने मधुमेहही नियंत्रणात राहतो आणि वजनही वाढत नाही. त्यामुळे ब्रेकफास्टमध्ये ग्रीन टीचा समावेश करा.

ओटमील

ओटमील पोषक तत्वांनी समृद्ध असते. ब्रेकफास्टमध्ये ओटमीलचे सेवन केल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. ओटमीलमध्ये लोह, प्रथिने असतात जे आपल्याला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवतात.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)