मातृत्व ही प्रत्येक स्री साठी नितांत सुंदर अनुभूती असते. पहिल्यांदा बाळाची चाहूल लागले त्या क्षणापासून, स्री च्या शरीरात बदल जाणवू लागतात. शरीरासह ‘मानसीक आरोग्या’ तही (mental health) याकाळात अनेक चढउतार होत असतात. प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतरही स्रीयांना अधिकाधिक विश्रांतीची गरज असते. पहिल्यांदाच आई होँणाऱया मातांना बऱ्याच गोष्टी माहित नसतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नवजात बाळाची जबाबदारी. आधीच प्रसूतीमुळे माता थकलेली असते. बाळाच्या उठण्या-झोपण्याच्या वेळा तिला त्रासदायक (Annoying) होतात. त्यात तिला दर दोन-तीन तासांनी स्तनपान करावे लागते. अशा परिस्थितीत आई ची आणि बाळाची योग्य काळजी न घेतल्यास, महिलांना कमी वयातच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे, जर बाळाची योग्य काळजी घेतली नाही तर त्याच्यासाठी देखील सर्व समस्या उद्भवू शकतात. ज्या महिला एकट्या राहतात किंवा पहिल्यांदाच आई होत आहेत, त्यांना याबाबत फारशी माहिती नसते. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत.
1. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बाळाच्या जन्मानंतर प्रत्येक आईला स्तनपानाबाबत समुपदेशन केले पाहिजे. यामुळे मनातील सर्व भ्रम दूर होतील आणि स्त्रीला समजेल की उत्तम आहार दिल्याने केवळ बाळाला पोषण मिळत नाही तर आईलाही आरोग्याशी संबंधित सर्व फायदे मिळतात. याशिवाय, जर एखादी महिला पहिल्यांदाच आई झाली असेल, तर तिला समजेल की बाळासाठी आईचे दूध हे मुलासाठी सर्वोत्तम अन्न मानले जाते.
2. मुलाला जन्म दिल्यानंतर किमान 24 तास खूप महत्वाचे असतात. या दरम्यान आई आणि मूल दोघांचीही उच्च दर्जाची काळजी घेतली पाहिजे. नवजात बाळाची योग्य काळजी घेण्यासाठी बाळाच्या पालकांनी मिळून जबाबदारी घेतली पाहिजे.
3. प्रसूतीनंतर महिलांचे शरीर पूर्वीसारखे राहत नाही. ते पूर्वीसारखे बनवायला वेळ लागतो. अशा परिस्थितीत स्त्रिया अनेकदा प्रसूतीनंतरच्या नैराश्याच्या बळी ठरतात. अशा परिस्थितीत महिलांची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. याशिवाय प्रसूतीनंतर तज्ज्ञांच्या सूचनेनुसार महिलेने वेळोवेळी तिची आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे.
4. मुलाला जन्म दिल्यानंतर आईचे शरीर खूपच कमजोर होते. त्याच वेळी, अंगावरील दुध देत असतांना, शरीरावर देखील परिणाम होतो. अशा परिस्थितीत स्त्रीला पोषक तत्वांनी युक्त आहार आवश्यक असतो. या दरम्यान स्त्रीने आपल्या आहारात संपूर्ण धान्य, भाज्या आणि फळे तसेच प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करावा. गोष्टी खायलाच हव्यात. शरीरात कोणत्याही प्रकारे पाण्याची कमतरता पडू होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे असते.