दुतोंडी केसाच्या समस्येला ट्रायकोप्टिलोसिस म्हणतात. हे अगदी सामान्य आहे. परंतु जर दुतोंडी केस जास्त वाढले तर ते केसांच्या क्युटिकलला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे केसांच्या आतील त्वचा खराब होऊ लागते आणि केस तूटतात, कोरडे होतात तसेच निर्जीव होऊन गळू लागतात. दुतोंडी केस होण्याची अनेक कारणे आहेत जसे की उष्माघात, रासायनिक उपचार, चुकीच्या खाण्याच्या सवयी, तणाव, पोषणाचा अभाव, प्रदूषण, हवामान आणि केसांना योग्य पोषण न मिळणे. दुतोंडी केसांची समस्या कमी करण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या केसांची काळजी घेणारे उत्पादने आणि उपचारांचा अवलंब करणे, दर एक ते दोन महिन्यांनी केस कापणे परंतु त्यानंतर सुद्धा कोणताही विशेष परिणाम दिसून येत नाही. ही समस्या कमी करण्यासाठी आई आणि आजीचे उपाय फायदेशीर ठरू शकतात.
कोरफड मध्ये अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन ई, ए आणि इतर पोषक घटक आढळतात. केसांसाठी हे घटक फायदेशीर ठरू शकतात. जर तुम्ही त्यात मध मिसळले तर ते कोरडे आणि दुतोंडी केसांचे समस्या कमी करण्यास देखील मदत करू शकते. यासाठी ताजा कोरफडीचा गर आणि एक चमचा मध हे एकत्र करून केसांना पूर्णपणे लावा आणि तीस ते चाळीस मिनिटे राहू द्या त्यानंतर केस शाम्पू ने धुवा.
कोरड्या आणि दुतोंडी केसांची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही केळीचा हेअर मास्क देखील लावू शकता. यासाठी एक केळी सोलून चांगली बारीक करून घ्या. यानंतर दोन चमचे मध आणि तीन चमचे ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल घालून चांगले मिसळा. आता हे मिश्रण केसांना वीस ते पंचवीस मिनिटे लावून ठेवा आणि काही वेळाने केस स्वच्छ धुवा.
कांद्याच्या रसामध्ये असलेले पोषक आणि सल्फर केसांचा संरचनात्मक नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि दुतोंडी केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात. केसांची मुळे मजबूत करण्यासोबतच कांद्याचा रस केसांची वाढ करण्यासही मदत करतो. एक कांदा कापून त्याचा रस काढा हा रस केसांच्या मुळांवर आणि टोकांना लावा आणि तीस मिनिटांनी शाम्पू ने स्वच्छ धुवा. त्यासोबतच ऑलिव्हमध्ये कांद्याचा रस एक चमचा मिसळून टाळूवर लावू शकता.