शरीरात कॉलेस्ट्रॉलची (High Cholesterol) पातळी वाढणे हे आरोग्याच्या दृष्टीने गंभीर (Dangerous for health) ठरू शकते. कोलेस्ट्रॉल हे आपल्या रक्तपेशींमध्ये असणारा मेणासारखा एक मऊ पदार्थ असतो. चांगल्या रक्तपेशींच्या निर्मितीसाठी कोलेस्ट्रॉल खूप महत्वाचे मानले जाते. कोलेस्ट्रॉलच्या मदतीने शरीरातील रक्तपेशी व इतर अवयवांचे कार्य सुरळीतपणे चालते. त्याशिवाय हार्मोन्स, व्हिटॅमिन्स आणि पचनासाठी आवश्यक द्रवाच्या उत्पादनातही, कोलेस्ट्रॉल महत्वपूर्ण भूमिका निभावतो. मात्र याच कोलेस्ट्रॉलची शरीरातील पातळी प्रमाणापेक्षा वाढली तर ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरते. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास धमन्यांमधील चरबी साठू लागते. ती चरबी वाढल्यास धमन्यांमधील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हृदयविकार (Heart disease) आणि स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो. मुख्य म्हणजे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याची लक्षणे शरीरावर अशी सहज दिसून येत नाहीत. त्यामुळेच हाय कोलेस्ट्रॉलला ‘सायलंट किलर’ असेही म्हटले जाते. त्यामुळे शरीरात कोणतेही वेगळे बदल दिसू अथवा जाणवू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरि त डॉक्टरांना दाखवावे. आपल्या केसांमध्ये होणारे काही बदलही वाढत्या कोलेस्ट्रॉलचे संकेत असू शकतात.
जॉन हॉपकिन्स मधील संशोधकांनी उंदरांवर एक संशोधन केले होते. कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने तब्येतीवर तसेच केसांवर गंभीर परिणाम होतात. नेचर जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्स मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या संशोधनानुसार, हाय कोलेस्ट्रॉलमुळे मोठ्या प्रमाणात केस गळणे व ते पांढरे होण्याची समस्या भेडसावू शकते. त्याशिवाय संशोधकांनी काही उंदरांवर एथेरोस्क्लेरोसिस कंडीशनची चाचणीही केली. या स्थितीमध्ये धमन्यांच्या आथ चरबी साठल्याने रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. या चाचणीसाठी उंदरांचे दोन गट पाडण्यात आले. त्यापैकी एक गटातील उंदरांना नॉर्मल जेवण देण्यात आले तर दुसऱ्या गटातील उंदरांना हाय फॅट व कोलेस्ट्रॉल वाढेल असे पदार्थ खाण्यासाठी देण्यात आले होते. नॉर्मल जेवण देण्यात आलेल्या उंदरांमध्ये फारसे बदल झाले नाहीत. मात्र हाय फॅट पदार्थ खाल्लेल्या उंदरांमध्ये केस गळणे व ते पांढरे होणे, असे धोकादायक परिणाम दिसून आल्याचे, संशोधकांनी नमूद केले. त्यामुळे कोलेस्ट्ऱ़ॉल वाढवणारे पदार्थ खाल्ल्यास केसांवर गंभीर परिणाम दिसून येतात.
कोलेस्ट्रॉलची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास रक्तवाहिन्या पातळ होतात, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो अथवा ते अडकते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.
– छाती, हात व खांद्यांमध्ये वेदना जाणवणे.
– चक्कर येणे, उलटी होणे, डोकेदुखी
– श्वास घेण्यास त्रास होणे
– जास्त प्रमाणात मद्यपान करणे.
– धूम्रपान करणे .
– व्यायाम न करणे
– पुरेशी झोप न घेणे
– जास्त ताण- तणावाचा सामना करावा लागणे
– चरबीयुक्त पदार्थांचे अति सेवन