नवी दिल्ली – वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक लोकं डाएटिंग (dieting) करतात, भरपूर वर्कआऊटही करत असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारची डाएट ट्रेंडमध्ये असून, लोक ते फॉलोही करत असतात. तर काही लोक जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम (workout and exercise) करतात, पण आहार आणि लाइफस्टाईल यांच्यात बदल करत नाहीत. त्यामुळे वजन कमी करण्यात त्यांना यश मिळत नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, आजकाल लोकांचे जंक फूड (junk food) खाण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे वजन आणखी वाढते. जर तुम्हीही वाढते वजन किंवा लठ्ठपणामुळे त्रासला असाल तर काही गोष्टी लक्षात ठेऊन त्यांचे कटाक्षाने पालन करावे.
खाताना टीव्ही पाहू नये
अनेक लोकांना जेवताना टीव्ही पहायची सवय असते. तुम्हालाही अशी सवय असेल तर त्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. डॉक्टरांच्या मतानुसार, टीव्ही पाहताना जेवल्याने आपलं जेवणाकडे लक्ष नसतं. त्यामुळे आपण जास्त खाो. त्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. टीव्ही बघताना अनेक जण जंक फूडचे जास्त सेवन करतात. वजन कमी करायचे असेल तर जेवताना टीव्ही पाहणं बंद करावे.
गोड चहा पिऊ नका
काही लोकांना गोड चहा पिण्याची सवय असते. साखरेच्या अतिवापरामुळे शरीरातील साखर आणि चरबी (फॅट्स) वाढते. त्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोकाही वाढतो. वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर गोड चहा पिणं टाळावं. विशेष म्हणजे फुल क्रीमच्या (साय) दुधापासून बनवलेला चहा अजिबात पिऊ नये. यामुळेही तुमचं वजन वाढू शकतं. त्याचबरोबर अन्न पदार्थ तयार करताना त्यामध्य साखरेचा वापर मर्यादित प्रमाणात करावा.
नाश्ता न करणे
अनेकदा असे दिसून येते की लोक रात्री उशीरापर्यंत जागे राहतात आणि सकाळी उशिरा उठतात. त्यासाठी लोकांकडे वेळ कमी असतो व ते नाश्ता अथवा न्यारी करणं टाळतात. मग ऑफीसला गेल्यावर भूक लागली तर जंक फूड खाल्लं जातं. या सवयीमुळे वजन वेगाने वाढते. तुम्हालाही अशी चुकीची सवय असेल तर ते ताबडतोब बंद करा. नाश्ता करणे अजिबात टाळू नये. नाश्त्यामध्ये फळे आणि फायबरयुक्त पदार्थ खावेत.
पाणी न पिणे
अनेक लोक दिवसाची सुरुवात चहा पिऊन करतात. जर तुम्हालाही वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर दिवसाची सुरूवात कोमट पाणी पिऊन करावी. त्यामुळे मेटाबॉलिज्म वाढते तसेच शरीरातील विषारी घटकही बाहेर पडतात. त्याचबरोबर पुरेसे पाणी प्यायल्याने पचनशक्ती मजबूत होते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)