तुमचा मुलाला (child) सतत थकवा जाणवत आहे. मग वेळीच सावधान व्हा, त्याचा शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. आपल्या मुलगा या स्पर्धेच्या जगात सगळ्यात पुढे असावा असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं असतं. त्यासाठी मुलांचा खाण्यापिण्याकडे आईवडिल (Parents) विशेष लक्ष देतात. तरी काही मुलं ही थकल्यासारखी वाटतात. एक्टिवीटी (activity) वाटत नाही. यासगळ्यामागे मुलांमध्ये काही व्हिटॅमिनयुक्त पदार्थांची कमी असू शकते. डॉक्टरांकडून मुलांची तपासणी करुन घ्यावी. आजकाल आपल्या शरीरात कुठल्या गोष्टीची कमी आहे हे चाचण्या केल्यानंतर कळतं. अशाप्रकारच्या चाचण्या करुन घ्या. मुलांना हेल्दी फूड द्या. सोबतच आहारातून सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन पोहोचत आहे याची काळजी घ्या. आज आम्ही तुम्हाला असे काही व्हिटॅमिन युक्त पदार्थ सांगणार आहोत. जे तुम्ही मुलांचा आहारात समावेश करू शकता.
शरीरात वाइट ब्लड सेल्स निर्माण करण्यासाठी व्हिटॅमिन बी6 महत्त्वाचे आहे. तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मुलांच्या आहारात व्हिटॅमिन बी6चा समावेश करावा.
व्हिटॅमिन बी 6 पदार्थ
1. केळी
2. चना
3. फिश
4. सी फूड्स
यातून आपल्या शरीराला अँटिऑक्सिडेंट मिळतं. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सीची गरज आहे. तसंच पांढऱ्या पेशीच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे.
व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ
1. संत्री
2. लिंबू
3. दही
व्हिटॅमिन ईमुळेही अँटीऑक्सिडट्स वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. व्हिटॅमिन ईचा आहारात समावेश केल्यास अशक्तपणा जाणवणार नाही.
व्हिटॅमिन ईयुक्त पदार्थ
1. अॅव्होकॅडो
2. लाल शिमला मिरची
3. बदाम
हे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना गरजेच असते. आणि हे मिळविण्याचा सोपा मार्ग म्हणजे सूर्यप्रकाश. दिवसातून 15 मिनिटं सूर्यप्रकाशात तुम्ही बसल्यास तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळतं. व्हिटॅमिन डीची कमी असल्याने मुलांमध्ये थकवा जाणवतो.व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थ
1. दूध
2. अंडी
3. सोया दूध
लहान मुलांचा संतुलित आहार खूप महत्त्वाचा असतो. आहारातून मुलांचं आयुष्य घडतं. आणि त्यांचा निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार खूप गरजेचा आहे. त्यामुळे मुलांच्या दैनंदिन आहारात या गोष्टींचा समावेश करा.
1. फळं
2. लाल डाळ आणि रताळ
3. ओट्स आणि दूध
4. हिरवा भाजीपाला
5. चिकन, फिश आणि अंडी
6. भात आणि कडधान्ये
लहानपणापासूनच मुलांना सगळं खाण्याची सवय लावली पाहिजे. आणि संतुलित आणि योग्य पद्धतीने जेवण्याला प्राधान्य द्या.
टीप : या बातमीतील सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.
इतर बातम्या:
IND vs SL: टी20 सीरीजआधी भारताला मोठा झटका, स्विंगचा सुल्तान संघाबाहेर
Health Tips: यूरिक अॅसिडची समस्या त्रास देतेय ? वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि उपचारपद्धती