पुणे : पुण्यामध्ये अस्थमावरील (Asthma) एका खास वनस्पतीचा शोध लागला आहे. या वनस्पतीचे नाव अंतमूळ असे आहे. विशेष म्हणजे असे सांगितले जात आहे की, ही अस्थमावर उपचार करण्यासाठी रामबाण वनस्पती आहे. पुण्यातील भारतीय वनस्पती सर्वेक्षण अर्थात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाने अंतमूळ नावाची औषधी वनस्पती (Herbs) रुग्णांच्या उपचारांसाठी उपलब्ध करून दिली आहे. पुण्यामध्ये (Pune) बीएसआयचे मोठे कार्यालय असून ते जवळपास 60 वर्ष जुने आहे. या कार्यालयाच्या परिसरामध्ये अनेक औषधी वनस्पती आपल्याला बघायला मिळतील.
या अंतमूळ नावाच्या वनस्पतीची पाने अत्यंत खास आहेत. या वनस्पतीमध्ये टायलोफ्लोरिन नावाचे अल्कलॉईड आहे. विशेष म्हणजे याचा वापर अनेक ट्रायल्समध्ये केला जाऊ शकतो, हे समजले आहे. या दरम्यानच आता अस्थमा आजारावर ही वनस्पती प्रभावी असल्याचे समोर आले आहे. आता अनेक औषधी कंपन्यांनी या वनस्पतीच्या पानांचा काढा केला आणि त्यामध्ये 1 टक्का अल्कलॉईड देखील आहे. या वनस्पतीचे अंतमूळ हे आयुर्वेदातील नाव आहे. बॉटनीमध्ये या वनस्पतीला टायलोफ्लोरा अस्थमॅटिका असे म्हटंले जाते. विशेष म्हणजे ही वनस्पती फक्त अस्थमासाठी गुणकारी नसून त्वचेसाठी देखील रामबाण आहे.
अस्थमावरील रामबाण उपाय असलेली ही वनस्पती आता बीएसआयच्या वनस्पती उद्यानमध्ये दिसणार आहे. या उद्यानामध्ये अनेक जातीच्या औषधी वनस्पती लावून त्याचे संरक्षण केले जाते. या उद्यानमध्ये नेमक्या किती औषधी वनस्पती आहेत, हे सांगणे थोडे अवघड आहे. कारण याची माहिती फक्त आणि फक्त येथील शास्त्रज्ञांनाच असते. जर आपल्यालाही अस्थमाचा त्रास होत असेल तर आपणही बीएसआयमध्ये जाऊन या अस्थमावरील हे औषध घेऊ शकता. मात्र, ही वनस्पती कोणालाही दिली जात नाही. यासाठी आपल्याला डाॅक्टरांचे तसे पत्र लागते. रूग्णांला आपल्या स्वत: च्या जबाबदारीवर याचे सेवन करावे लागते.
संबंधित बातम्या :
Health Care Tips : उन्हाळ्यात हे 5 पदार्थ नक्की खा आणि निरोगी राहा!
Skin Care | सनस्क्रीन त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, मात्र खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा!