मुंबई : आपल्या शरीरात कॅल्शियमची (Calcium) कमी निर्माण झाल्यास आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. शरीरात दुखणे, दातांमध्ये समस्या किंवा सांधेदुखीची समस्या उद्भवते. बर्याचदा लोक व्यस्त जीवनात आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत आणि त्यांच्या शरीरात (Body) कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता सुरू होते. तज्ज्ञांच्या मते, शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास संधिवात, ऑस्टिओपोरोसिस, स्नायूंमध्ये क्रॅम्प, कमकुवत नखे, मासिक पाळीत जास्त दुखणे, डोकेदुखी, नैराश्य, हृदयाचे ठोके अनियमित होणे यासारख्या समस्या (Problem) समोर येऊ शकतात. शरीरातील कॅल्शियम कमतरता दूर करण्यासाठी आपण काही महत्वाच्या टिप्स फाॅलो करायला हव्यात.
नारळ हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. बाजारात सहज उपलब्ध होणार्या नारळाच्या दुधाची भाजीही तुम्ही बनवू शकता. तुम्ही ते सूप, चिया बिया आणि इतर गोष्टींमध्ये मिसळून सेवन करू शकता. जर तुमचे मूल दूध पिणे टाळत असेल तर तुम्ही यामध्येही नारळाच्या दुधाची मदत घेऊ शकता. तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता आणि तुमच्या मुलाला खायला देऊ शकता.
जर तुम्हाला साधे दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही काजूच्या दुधाचा देखील आहारात मसावेश करू शकता. मात्र, उन्हाळ्यात काजूचे दूध हानी पोहोचवू शकते. तुम्ही उन्हात किंवा पावसाळ्यात काजू रात्रभर भिजत ठेवा आणि पेस्ट बनवल्यानंतर सकाळी दुधात उकळा. दुधात साखर घालायची नसेल तर त्याऐवजी मध किंवा गूळ घाला, पण त्याचे प्रमाण कमी ठेवा. यामुळे आपल्या शरीराला कॅल्शियम मिळते.
दुधात बदाम टाकून प्यायल्यास फायदा होऊ शकतो. बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी दूधात मिक्स करून प्या. यामुळे आपल्या शरीराला फायदा होईल. या दुधात मध किंवा गूळ घालून कोमट झाल्यावर प्या. काही दिवसात तुम्हाला हाडांच्या दुखण्यात फरक दिसून येईल. तसेच हे दूध लहान मुलांना देखील प्रचंड आवडेल.