शाकाहारी लोकांनी शरीरातील ओमेगा 3 फॅटी ॲसिडची कमतरता दूर करण्यासाठी या खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

| Updated on: Jun 16, 2022 | 10:47 AM

आपल्यापैकी अनेकांच्या घरी राजमाची भाजी केली जाते. बरेच लोक सलाडमध्येही राजमाचा समावेश करतात. विशेष म्हणजे राजमामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. यामुळेच आपण आपल्या आहारामध्ये जास्तीत-जास्त राजमाचा समावेश करावा. वजन कमी करण्यासाठी आपण आहारामध्ये राजमाची उसळ करून खाऊ शकतो.

शाकाहारी लोकांनी शरीरातील ओमेगा 3 फॅटी ॲसिडची कमतरता दूर करण्यासाठी या खास पदार्थांचा आहारात समावेश करा!
Image Credit source: istockphoto.com
Follow us on

मुंबई : ओमेगा 3 फॅटी ॲसिड (Omega 3 fatty acids) हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीर ओमेगा 3 फॅटी ॲसिड स्वत: तयार करू शकत नाही. आपण आपल्या आहारात ओमेगा 3 फॅटी ॲसिड समृद्ध पदार्थांचा समावेश केला पाहिजे, ज्यामध्ये फ्लेक्ससीड्स, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा आणि मासे इत्यादींचा समावेश होतो. ओमेगा 3 फॅटी ॲसिड हृदयाशी संबंधित समस्या टाळण्यास आणि जळजळ (Inflammation) कमी करण्यास मदत करतात. बरेच लोक ओमेगा 3 ची कमतरता दूर करण्यासाठी गोळ्या देखील घेतात. मात्र, दरवेळी ओळ्या घेऊन शरीरातील ओमेगा 3 फॅटी ॲसिडची समस्या (Problem) दूर करणे चुकीचे आहे. आपण आहारामधूनच ओमेगा 3 फॅटी ॲसिड घ्यायला हवे. ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा मुख्य स्त्रोत मासे आहे. यामुळे दररोजच्या आहारात मासांचा नक्कीच समावेश करा. शाकाहारी लोकांनी शरीरातील ओमेगा 3 फॅटी ॲसिडची कमतरता भरून काढण्यासाठी नेमक्या कोणत्या पदार्थांचा आहारात मसावेश करायला हवा, हे आपण बघणार आहोत.

अक्रोड

अक्रोड हा ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे दररोज अक्रोडचे सेवन करायला हवे. अक्रोडमुळे त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत होते. अक्रोड आपल्याला अनेक आजारांपासून देखील दूर ठेवतो. अक्रोडची बारीक पेस्ट तयार करून ठेवा आणि दुधामध्ये मिक्स करून प्या. यामुळे वजनही कमी होण्यास मदत होईल आणि शरीरातील ओमेगा 3 फॅटी ॲसिडची कमतरता देखील दूर होईल.

हे सुद्धा वाचा

राजमा

आपल्यापैकी अनेकांच्या घरी राजमाची भाजी केली जाते. बरेच लोक सलाडमध्येही राजमाचा समावेश करतात. विशेष म्हणजे राजमामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. यामुळेच आपण आपल्या आहारामध्ये जास्तीत-जास्त राजमाचा समावेश करावा. वजन कमी करण्यासाठी आपण आहारामध्ये राजमाची उसळ करून खाऊ शकतो. यामुळे वजन कमी होण्यासोबतच शरीरातील ओमेगा 3 फॅटी ॲसिडची समस्याही दूर होते.

सब्जा

सब्जा खाण्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. सब्जा पोटीतील उष्णता दूर करण्यास मदत करतो. शिवाय ज्यांना मुळव्याधाचा त्रास होतो, अशांनी दररोज सकाळी एक ग्लासमध्ये एक चमचा सब्जा टाकून सेवन केल्याने मुळव्याधाचा त्रास दूर होण्यास मदत होते. महत्वाचे म्हणजे सब्जामध्ये ओमेगा 3 फॅटीन ॲसिडअसते. तसेच त्यामध्ये फायबर आणि प्रथिने असतात. याचे सेवन आरोग्याला अनेक फायदे देण्याचे काम करते.