मुंबई : यूरिक अॅसिड (Uric acid) वाढल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. हे रक्तातील एक प्रकारचे रसायन आहे. अन्नातील प्युरिनचे तुकडे करून यूरिक अॅसिड तयार होते. जेव्हा यूरिक अॅसिड सामान्य पातळीवर तयार होते, तेव्हा कोणतीही समस्या नसते. पण जेव्हा रक्तातील यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढते, तेव्हा त्रास अधिक होतो. किडनी (Kidney) ते बाहेर काढू शकत नाही. परिणामी, रक्तातील यूरिक अॅसिडची पातळी वाढते. जसजसे यूरिक अॅसिड तयार होते, ते हात आणि पायांमध्ये तयार होते. त्यामुळेच सांधेदुखीचा (Joint pain) त्रास आणि पायाच्या तळव्यांचा त्रास जास्त होतो. यूरिक अॅसिडमुळे अनेक वेळ किडनी स्ट्रोक होण्याची देखील शक्यता असते. जर तुमच्याही शरीरामध्ये यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढले असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये राजमा, मटण, मसूर यांचा समावेश अजिबात करू नका.
यूरिक अॅसिडची समस्या शरीरामध्ये निर्माण झाल्यास सर्वात अगोदर आपले पाय सूजण्यास सुरूवात होते. चालण्यास त्रास होणे, सांध्यांना सूज येणे ही सर्व यूरिक अॅसिडची सुरुवातीची लक्षणे आहेत. बहुतेक केसेसमध्ये आपल्या पायांची बोटे मोठ्या प्रमाणात सूजतात. तसेच पाठदुखीसोबत लघवीचीही समस्या निर्माण होते. वजन वाढल्याने देखील यूरिक अॅसिडची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे शक्यतो वजनावर नियंत्रण ठेवा. आपल्यापैकी अनेकांना कॉफी, कोल्ड्रिंक्स, मद्यपान आणि धूम्रपान करण्याची सवय मोठ्या प्रमाणात असते. यूरिक अॅसिड वाढण्याचे हे एक मुख्य कारण आहे.
जर तुमच्या शरीरामध्ये यूरिक अॅसिडचे प्रमाणात अधिक झाले असेल तर कोल्ड्रिंक्स आणि मद्यपान पिणे टाळा. जेव्हा प्युरीन तुटते तेव्हा आपल्या शरीरात जास्त प्रमाणात यूरिक अॅसिड तयार होते. मूत्रपिंडांद्वारे रेचक म्हणून अतिरिक्त यूरिक अॅसिडचे शरीरातून बाहेर पडत असल्याने, अधिक प्रथिनांची समस्या वाढते. यामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता असते. यादरम्याम आपण लाल मांस खाणे देखील बंद करायला हवे. यूरिक अॅसिडवर जर आपल्याला नियंत्रण ठेवायचे असेल तर आपण सर्वात अगोदर आपले वाढलेले वजन कमी करावे. वजन वाढल्याने यूरिक अॅसिडची अनेक समस्या उद्भवू शकते. यासाठी आपण दररोज किमान 30 मिनिटे चालायला हवे. जिम, योगा, पोहणे असे कुठल्याही पध्दतीचे व्यायाम आपण दररोज करायला हवेत.