नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढलेला असताना तुम्ही निष्काळजीपणा करत असाल तर वेळीच सावध व्हा. दुसऱ्या लाटेचा कहर दिवसे न् दिवस वाढतच जात आहे. रोज हजारो लोकांना कोरोनाचा संसर्ग होत असून कोरोना बळींची संख्याही वाढताना दिसत आहे. एका रिपोर्टच्या निष्कर्षात तर तर जून महिन्यात देशात दरदिवशी 2300 रुग्ण दगावण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आताच सावध व्हा. निष्काळजीपणा करू नका, असं आवाहन करण्यात येत आहे. (India may see 2320 people will die every day from corona in june: Lancet report)
लान्सेट कोविड- 19 कमिशनच्या अहवालात ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार भारतात रोज कोरोनामुळे दगावणाऱ्यांचा आकडा 1750 वर जाण्याची शक्यता आहे. जूनच्या आधी ही संख्या 2320वर जाऊ शकते. लान्सेट कोवि-19 कमिशनचा हा अहवाल भारत सरकारच्या कोरोना टास्क फोर्सने तयार केला आहे. ‘भारतातील कोरोची दुसरी लाट आणि तातडीच्या उपाययोजना’ या शिर्षकाखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात काही महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करण्यात आले आहेत. त्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे.
20 जिल्ह्यात 50 टक्के केस
या रिपोर्टनुसार, कोरोनाच्या पहिल्या लाटेत 50 टक्के केसेस देशातील 40 जिल्ह्यात होत्या. दुसरी लाट येईपर्यंत या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आता केवळ 20 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या 50 टक्के केसेस आहेत. या ठिकाणी कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग आहे. यावरून कोरोनाने देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात हायपाय पसरले असल्याचं दिसून येतं.
दुसरी लाट महाभंयकर
कोरोनाच्या पहिल्या लाटेतील 75 टक्के केसेस 60 ते 100 जिल्ह्यात दिसून आले होते. आता केवळ 20 ते 40 जिल्ह्यात 75 टक्के केसेस आहेत. या अहवालानुसार कोरोनाची पहिली लाट इतकी धोकादायक नव्हती. मात्र, दुसरी लाट अधिकच धोकादायक आहे. त्यामुळेच सर्वांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. थोडासा निष्काळजीपणाही जीवावर उठू शकतो, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
संसर्ग वाढीचा दर वेगाने वाढतोय
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाच संसर्ग झपाट्याने वाढतोय. पहिल्या लाटेवेळी कोरोनाची 10 हजार रुग्णसंख्या 80 हजार होण्यासाठी 83 दिवस लागत होते. मात्र, यावर्षी फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत केवळ 40 दिवसातच हा आकडा 80 घरात जात आहे, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. (India may see 2320 people will die every day from corona in june: Lancet report)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 17 April 2021 https://t.co/hBKkoOClJy #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 17, 2021
संबंधित बातम्या:
गोकुळ दूधसंघ निवडणूक : ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू, मेळाव्यानंतर आठ जण पॉझिटिव्ह
Kumbh Mela : कुंभमेळा प्रतिकात्मक करा, पंतप्रधान मोदींचं आवाहन, आखाड्याचा तातडीने रिप्लाय
(India may see 2320 people will die every day from corona in june: Lancet report)