Indoor Air Pollution: घरातही असू शकते प्रदूषण, या ट्रिक्सचा वापर करून हवा ठेवा स्वच्छ

| Updated on: Nov 04, 2022 | 11:01 AM

घरात असलेले प्रदूषणही तुम्हाला आजारी पाडू शकते. घरातील प्रदूषण टाळण्यासाठी काही ट्रिक्स जाणून घेऊया.

Indoor Air Pollution: घरातही असू शकते प्रदूषण, या ट्रिक्सचा वापर करून हवा ठेवा स्वच्छ
Follow us on

नवी दिल्ली – दिवाळीसारख्या मोठ्या सणानंतर भारतातील बहुतेक भागात प्रदूषणाची (air pollution) पातळी लक्षणीय प्रमाणात वाढते. या विषारी हवेमध्ये श्वास घेणे (breathing) अतिशय कठीण होते आणि बहुतेक लोक सर्दी, खोकला, किंवा ॲलर्जीमुळे त्रस्त होतात. यामुळे आपले आरोग्य तसेच त्वचेलाही त्रास (health and skin problem) होतो. एवढेच नव्हे तर डोळ्यांची जळजळ होणे, खाज सुटणे अशा समस्याही उद्भवतात. घराबाहेरचे प्रदूषण लक्षात घेऊन लोक काळजी घेत स्वत:ला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्हाला माहिती आहे का की घरात असलेले प्रदूषणही आपल्याला आजारी बनवू शकते. घरातील प्रदूषण टाळण्यासाठी काही उपाय जाणून घेऊया

या गोष्टींमुळे वाढते घरातील प्रदूषण

हे सुद्धा वाचा

आपल्या घरात अशा अनेक गोष्टी असतात, ज्यामुळे घरातील प्रदूषणाची पातळी सहज वाढू शकते. फ्रीज, इन्व्हर्टर, लॅपटॉप, ट्यूब लाइट्स या वीजेवर चालणाऱ्या वस्तू देखील घरातील हवेची गुणवत्ता खराब करू शकतात. या गोष्टींचा वापर केल्याने त्यांच्यामधून उत्सर्जित होणाऱ्या वायूमुळे प्रदूषण वाढते. त्यामुळे आपल्याला दम्यासारख्या आजाराचा सामना करावा लागू शकतो.

घरातील प्रदूषण दूर करण्याचे उपाय

गरम पाण्याने धुवा चादरी – आपल्या बेडवरील चादरी, पांघरूणे तसेच सोफा कव्हर्स हे नेहमी गरम पाण्याने धुवावे. असे केल्याने त्यांच्यावर असलेली घाण सहज काढता येते. दैनंदिन वापरातील या वस्तूंवरील धूळ किंवा मातीमुळे डोळ्यांमध्ये जळजळ होणे किंवा खाज सुटणे, अशा समस्या उद्भवू शकतात.

एअर प्युरिफायर – आपल्या घरात प्रदूषण असू शकते मात्र दुर्दैवाने आपल्याला ते दिसत नाही. घरातील हवा स्वच्छ ठेवायची असेल तर एअर प्युरिफायरचा वापर करावा.

व्हॅक्युम क्लिनर – घरात ठेवलेले फर्निचर नियमितपणे स्वच्छ करावे. त्याच्यावर असलेली धूळ किंवा माती फुफ्फुसात जाऊन आपल्याला आजारी पाडू शकते. फर्निचर स्वच्छ करण्यासाठी केवळ कापडाचा वापर पुरेसा नाही, ते नीट स्वच्छ होत नाही. त्यासाठी व्हॅक्युम क्लिनरची मदत घ्यावी.

व्हेंटिलेशन वाढवा – बाहेरच्या प्रदूषणामुळे श्वसनाच्या समस्या वाढू शकतात. बाहेरून येणारी दूषित हवा टाळण्यासाठी ट्रिकल व्हेंटिलेशनचा वापर करा. हे हवा फिल्टर करण्याचे काम करते. खिडकीतून येणारी हवा ताजी करून आत पाठवली जाते.