मुंबई : तीन वर्षांपूर्वी कोरोनाचा उद्रेक झाला, ज्यामुळे संपूर्ण जग ठप्प झालं होतं. लॉकडाऊन हाच कोरोनाच प्रसार रोखण्याचा एकमेव मार्ग होता. कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांनी आपले प्राण गमावले. चीनमधून कोरोनाची सुरुवात झाली. हळूहळू संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हातपाय पसरले. लस हाच कोरोनाला रोखण्याचा एकमेव मार्ग होता. कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येईपर्यंत जगातील अनेक देश अनेक महिने लॉकडाऊनमध्ये होते. लस आल्यानंतर हळूहळू जगाची कोरोनाच्या विळख्यातून सुटका झाली. मात्र, अजूनही कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट येत असतात. त्यामुळे चिंता वाढते. संपूर्ण जगाने दोनवेळा कोरोनामुळे लॉकडाऊनचा अनुभव घेतला. आता कोरोनाच्या JN 1 या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे.
JN 1 व्हेरिएंटमुळे अमेरिका, चीन, सिंगापूरसह भारतातही रुग्णसंख्या वाढतेय. काही रुग्णांचे या नव्या व्हेरिएंटमुळे मृत्यू सुद्धा झालेत. त्यामुळे चिंता वाटण स्वाभाविक आहे. JN 1 हा फार धोकादायक व्हेरिएंट नाहीय, असं काही एक्सपर्ट्सच मत आहे. मात्र, तरीही काळजी घेण देखील तितकच आवश्यक आहे. JN 1 व्हेरिएंटमुळे कोरोनाची आणखी एक लस घ्यावी का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्यावर एक्सपर्ट्स काय म्हणतात? ते जाणून घेऊया.
….तेव्हाच होईल लसीकरणाचा विचार
दिल्लीच्या राजीव गांधी हॉस्पिटलमधील कोविड नोडल अधिकारी डॉ. अजित जैन म्हणतात की, “जेएन वेरिएंटसाठी कोरोना लसीचा आणखी एक डोस घेण्याची सध्या गरज नाही. काही रुग्णांना आणखी एक डोस घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो” या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ICMR चे तज्ज्ञ अंतिम निर्णय घेतील. या वेरिएंटच्या रुग्णांमध्ये कशी लक्षण दिसतात, ते लवकरच समजेल. सध्या केसेस कमी आहेत. जेएन 1 वेरिएंटमुळे रुग्ण संख्या वाढली, तर लसीकरणाचा विचार होऊ शकतो.
व्हायरस विरोधात इम्युनिटी लेव्हल कशी आहे? ते सुद्धा पहाव लागेल. केसेस वाढल्या आणि हॉस्पिटलायजेशन वाढल नाही, तर इम्युनिटी लेव्हल ठीक आहे. लोकांनी कोरोना बद्दल सर्तक रहाव, कुठलही दुर्लक्ष करु नये.