पावसाळा सगळ्यांनाच आवडतो. पावसाळ्यात गरमागरम भजी खाणे, चहा पिणे ही काही औरच असते. हिवाळा आणि पावसाळा आला की, लोक पाण्याचे सेवन कमी (Reduce water intake) करू लागतात. तसेच पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे अनेक वेळा अंघोळ करणे टाळतात. थंड पाण्यापासून तर बरेच लोक गरम पाण्यानेही अंघोळ करणे टाळतात. परंतु पावसाळ्यात जर कोणी अंघोळ करणे टाळत असेल तर, शरीराचे खूप नुकसान (Too much damage to the body) होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक ऋतूत दररोज अंघोळ करण्याचा सल्ला तज्ञ देतात. पावसाळ्यात थंड वातावरणामुळे जर, कोणी अंघोळ टाळत असेल तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हीही कधी-कधी हवामान पाहता अंघोळ न करण्याचे (Not bathing) कारण बनवत असाल तर पावसाळ्यात अंघोळ न करण्याचे दुष्परिणाम देखील जाणून घ्या.
हेल्थलाइनच्या मते, आपल्या शरीरावर अनेक जंतू आणि पेशी असतात. जर एखाद्याने बरेच दिवस अंघोळ केली नाही तर त्याच्या शरीरावर मृत पेशी तयार होतात. ज्यामुळे शरीराला खूप नुकसान होते. पावसाळ्यात अंघोळ न केल्यामुळे कंबरेच्या भागात मृत पेशी अधिक विकसित होतात. ज्यामुळे संसर्ग आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. ते नंतर शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकते.
पावसाळ्यात सर्वत्र ओलावा राहतो, मग ते तुमचे घर असो किंवा कपडे. तुमच्या लक्षात आले असेल की, कोरडे कपडे देखील पावसात थोडेसे ओलसर वाटतात, याचे कारण म्हणजे वातावरणातील भरपूर आर्द्रता त्यात असते. आता अशा परिस्थितीत जर तुम्ही अंघोळ केली नाही तर शरीरात दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया तयार होतात. यानंतर, शरीरातून खूप दुर्गंधी येईल, ज्यामुळे इतर संक्रमण तर होतीलच मात्र, कुठलाही संसर्गजन्य रोग जडण्याची भीती कायम असते.
अंगचोळून अंघोळ केल्याने त्वचा चांगली राहते. हेल्थलाइनच्या मते, अंघोळ न केल्याने त्वचेवर जळजळ आणि इतर गंभीर परिस्थिती देखील होऊ शकते. म्हणूनच नेहमी अंघोळ करावी. प्रतिकारशक्ती कमी करते
जेव्हा एखादी व्यक्ती अंघोळ करत नाही तेव्हा शरीरात उपस्थित विषाणू आणि बॅक्टेरियांची संख्या वाढण्यास अधिक वेळ मिळतो, शरीरावरच असंख्य बॅक्टेरिया तयार होत असल्याने इतर किरकोळ दुष्परीणामासह शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि इतर संसर्गाचा धोका देखील वाढतो.
जर एखाद्याने अंघोळ केली नाही तर काही काळासाठी शरीराच्या विशिष्ट भागाच्या त्वचेचा रंग गडद होऊ शकतो. अंघोळ केल्याने ही काळी त्वचा संपते, पण जर या खुणा अधिक गडद झाल्या तर ते शरीरात अधिक खोलवर पोहचु शकतात.
पावसाळ्यात शरीरातून निघणारा घाम आणि वातावरणातील आद्रतेमुळे दुप्पट प्रमाणात स्त्रवतो परिणामी ओलावा जास्त वाढल्याने शरीरात चिकटपणा येतो. अशातही, जर तुम्ही अंघोळ करतच नसाल तर चिकटपणा आणखी वाढेल, त्यातून अस्वस्थता वाढू शकते