मुंबई : राजधानी दिल्लीत महानगरी संस्कृतीतील , विविध अठरा-पगड जातीचे, सुमारे 2.60 कोटी नागरिक राहतात. मात्र तरीही दिल्ली हे संपूर्ण देशातील कमी प्रजनन दर असलेले राज्य आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वास्थ्य सर्वेक्षण -5 (NFHS-5) नुसार, दिल्लीमध्ये एकूण प्रजनन दर (TFR) 1.5 इतका आहे. विशेष म्हणजे वंध्यत्वाच्या केसेस मध्ये सतत वाढ होत असून या काळात त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. NFHS-5 च्या नव्या रिपोर्टनुसार, शहरातील लोकसंख्येचा टीएफआर 2.1 इतका आहे. आजच्या काळात वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणाऱ्या दांपत्यांसाठी आयव्हीएफ (IVF)हा एक आशेचा किरण आहे. यामध्ये (IVF) समस्येची तपासणी आणि इलाज दोन्ही केले जातात. त्याशिवाय आयव्हीएफ, फर्टिलायझेशन आणि भ्रूणाचा विकास, यांच्याशी संबंधित समस्या ओळखण्यासही मदतशीर ठरते. गर्भधारणेच्या प्रक्रियेसाठी आयव्हीएफचा सल्ला दिला जातो. त्यात विट्रोत अंडाणु आणि शुक्राणूंचा संयोग घडवून आणला जातो. ही प्रक्रिया प्रजननासाठी मदतशीर ठरते. वध्यंत्वावरील उपाय आणि सरोगसीद्वारे गर्भधारणेसाठी ही प्रक्रिया वापरली जाते.
‘वंध्यत्वावर आयव्हीएफ हा शेवटचा उपाय आहे, ही अतिशय चुकीची समजूत आहे ‘, असे नवी दिल्ली येथील मदर्स लॅप आयव्हीएफ सेंटरच्या सीईओ डॉ. शोभा गुप्ता यांनी सांगितले. ‘मूल होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही अपयश आल्यास आयव्हीएफची मदत घ्यावी’, असे म्हटले जाते. मात्र हे अतिशय चुकीचे आहे. कधी-कधी एखाद्या स्त्रीला गर्भधारणा शक्यच नसते, ट्यूब ब्लॉकेज हेही गर्भधारणा न होण्यामागचे महत्वाचे कारण ठरू शकते. मूल होण्यासाठी आयव्हीएफ हा एकमेव आणि शेवटचा उपाय नाही, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
19 टक्के महिलांमधील वंध्यत्वाचे कारण हे पीसीओडी ( PCOD)आणि पीसीओएस (PCOS)असते. 2020 मध्ये महामारीच्या काळातील रिपोर्टनुसार, ट्ययुब ब्लॉकेजनंतर पीसीओएस हे महिलांमधील वंध्यत्वाचे दुसरे प्रमुख कारण आहे. गेल्या 5 वर्षांत ट्यूब ब्लॉकेज फॅक्टर आणि पीसीओएसमध्ये मोठ्य प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. महिलांमधील प्रजननांसदर्भातील इतर समस्यांमध्ये, 25 ते 34 वयोगटातील महिलांमध्ये लो ओव्हरियन रिझर्व समस्या दिसून आली, ज्यानंतर एंडोमेट्रियॉसिसचा नंबर लागतो. देशातील दक्षिण, पूर्व आणि इतर भागांच्या तुलनेत दिल्ली-एनसीआरमध्ये महिलांच्या प्रजनन क्षमेतवर परिणाम करणाऱ्या ट्यूबल फॅक्टरमध्ये आश्चर्यकारकरित्या वाढ झाल्याचे दिसून आले.
दिल्ली- एनसीआरमध्ये पुरुषांच्या प्रजनन क्षमतेशी निगडीत एझोस्पर्मियाच्या (Azoospermia)च्या केसेस जास्त सापडल्या आहेत. या स्थितीमध्ये पुरुषांमध्ये शुक्राणूच नसतात. पुरुषांमधील वंध्यत्वामागचे हे मोठे कारण आहे. वंध्यत्वातील 25 टक्के समस्या या एझोस्पर्मियामुळे होतात, त्यानंतर ॲस्देनोटरॅटोस्पर्मिया (Asthenoteratospermia) हे कारणीभूत आहे. ॲस्देनोटरॅटोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूंची गतिशीलता कमी होणे.
कधी-कधी 40 वर्षांहून अधिक वय असलेल्या महिलांना वंध्यत्वावरील प्राथमिक उपचार म्हणून आयव्हीएफचा सल्ला दिला जातो. तुम्हाला आरोगच्या काही तक्रारी असतील तरी गर्भधारणेसाठी आयव्हीएफची मदत घेता येऊ शकते. तुमची अथवा जोडीदाराची फॅलोपियन ट्यूब डॅमेज अथवा त्यामध्ये ब्लॉकेज असल्यास, ( गर्भधारणेसाठी) आयव्हीएफ हा एक पर्याय ठरू शकतो. फॅलोपियन ट्यूब डॅमेज असेल किंवा त्यामध्ये ब्लॉकेज असेल तर गर्भधारणेत अडथळा येऊ शकतो. काही वेळेस सर्व चाचण्यांनंतरही वंध्यत्वाचे मूळ कारण समजू शकत नाही . जर तुम्ही कॅन्सर सारख्या आजारावर मात करण्यासाठी रेडिएशन किंवा केमोथेरपी घेत असाल, तर त्याचा तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी ( गर्भधारणेसाठी) आयव्हीएफ हा एक पर्याय ठरू शकतो.