Weight Loss : खरोखरच जपानी टॉवेल व्यायाम 10 दिवसात वजन कमी करू शकतो? वाचा सविस्तर!

| Updated on: Oct 11, 2021 | 9:59 AM

प्रत्येकाला फ्लॅट अॅब्स आणि परफेक्ट फिगर हवी असते. असे शरीर बनवण्यासाठी लोक जिममध्ये तासन्तास घाम गाळतात. या व्यतिरिक्त, ओटीपोटाचा भाग घट्ट ठेवण्यासाठी लोक क्रंच, सिटअप्ससारखे कठीण व्यायाम करतात. आपल्या सर्वांना माहित आहे की पोटाची चरबी कमी करणे सोपे काम नाही.

Weight Loss : खरोखरच जपानी टॉवेल व्यायाम 10 दिवसात वजन कमी करू शकतो? वाचा सविस्तर!
Weight Loss
Follow us on

मुंबई : प्रत्येकाला फ्लॅट अॅब्स आणि परफेक्ट फिगर हवी असते. असे शरीर बनवण्यासाठी लोक जिममध्ये तासन्तास घाम गाळतात. या व्यतिरिक्त, ओटीपोटाचा भाग घट्ट ठेवण्यासाठी लोक क्रंच, सिटअप्ससारखे कठीण व्यायाम करतात. आपल्या सर्वांना माहित आहे की पोटाची चरबी कमी करणे सोपे काम नाही. डाएट आणि व्यायामासह वजन कमी होण्यास महिने लागतात.

जर तुम्हाला कोणी म्हटले की, 5 मिनिटांचे वर्कआउट करून, तुम्ही फक्त 10 दिवसात वजन कमी करू शकता. तर यावर तुमचा विश्वास बसेल का? सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असे सांगितले जात आहे की, जपानी टॉवेलच्या मदतीने 5 मिनिटांच्या व्यायामामुळे 10 दिवसात वजन कमी होईल. हा व्हिडिओ @tiabagha नावाच्या एका अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो प्रचंड व्हायरल देखील होत आहे. हा नेमका कोणता व्यायाम आहे याबद्दल जाणून घेऊयात.

जपानी टॉवेल व्यायाम म्हणजे काय?

हा व्यायाम एक दशकापूर्वी जपानी रिफ्लेक्सोलॉजी आणि मालिश तज्ञ डॉ. तोशिकी फुकुत्सुदजी यांनी शरीराला परिपूर्ण आकारात आणण्यासाठी विकसित केला होता. हा व्यायाम केल्याने पोटाची चरबी कमी होऊ शकते असा दावा त्यांनी केलेला आहे. याशिवाय, ते पाठ मजबूत करते आणि वेदना कमी करते. तसेच, मुद्रा देखील सुधारते. तज्ञांच्या मते, या व्यायामाद्वारे पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी केली जाऊ शकते. जी पेल्विक स्नायूंच्या चुकीच्या स्थानामुळे वाढते.

हा व्यायाम कसा करावा

1. हा व्यायाम करण्यासाठी एक टॉवेल आणि चटई घ्या. आता चटईवर आपल्या पाठीवर झोपा आणि दोन्ही हात आणि पाय शरीरापासून दूर पसरवा.

2. यानंतर कंबरेखाली एक टॉवेल ठेवा. यानंतर तुमचे पाय शरीरापासून थोडे दूर करा. आता पायाच्या बोटांना स्पर्श करा.

3. आता आपले हात डोक्याच्या वर आणि तळवे खाली करा. सुमारे 5 मिनिटे या स्थितीत राहा आणि विश्रांती घेताना हळूहळू आपले शरीर सामान्य स्थितीत आणा.

हे अत्यंत महत्वाचे

तज्ञांच्या मते, 10 मिनिटात पोटाची चरबी कमी करू शकत नाही. खरं तर, कोणताही व्यायाम इतक्या लवकर परिणाम देऊ शकत नाही. हा व्यायाम केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. या व्यतिरिक्त, हे पाठदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यास देखील मदत करते. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आहार, व्यायाम, झोप आणि इतर गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(japanese towel exercise beneficial for the body)