हाडांचे आजार असलेल्या व्यक्तीने करावे ‘या’ फळांचे सेवन

| Updated on: Apr 08, 2023 | 4:01 PM

जर तुम्हालाही सांध्यात खूप वेदना होत असतील तर या फळांचा आपल्या रुटीनमध्ये नक्कीच समावेश करा. कारण फळे आपल्या शरीराला ऊर्जावान बनवतात आणि हाडे मजबूत करतात.

हाडांचे आजार असलेल्या व्यक्तीने करावे या फळांचे सेवन
Fruits diet
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: वाढत्या वयाबरोबर आजकाल हाडेही खूप लवकर कमकुवत होत आहेत. सांधेदुखीने प्रत्येक व्यक्ती खूप त्रस्त असते. याचे कारण म्हणजे हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्याने सांध्यांमध्ये वेदना सुरू होतात. म्हातारपणी खूप वेदना होतात. जर तुम्हालाही सांध्यात खूप वेदना होत असतील तर या फळांचा आपल्या रुटीनमध्ये नक्कीच समावेश करा. कारण फळे आपल्या शरीराला ऊर्जावान बनवतात आणि हाडे मजबूत करतात.

  1. हाडांच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी सफरचंदाचे अधिक सेवन करावे. दिवसभरात एक सफरचंद अवश्य खावे. हे आपल्याला भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी देते. हे दोन्ही घटक आपल्याला आपल्या शरीरात कोलेजेन तयार करण्यास आणि हाडांच्या नवीन ऊती तयार करण्यास मदत करतात. त्यामुळे रोजच्या रुटीनमध्ये सफरचंद खा.
  2. स्ट्रॉबेरी फळदेखील आपल्याला खूप फायदेशीर ठरते, कारण त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे आपल्या कमकुवत हाडांना मजबूत करण्यास खूप मदत करते.
  3. पपई आणि अननसमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या हाडांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढवतात आणि मजबूत करतात. त्याचबरोबर अननसामध्ये पोटॅशियमचे प्रमाण आढळते. अननस हाडांच्या समस्येशी झगडत असलेल्या लोकांना फायदा देते , कारण पोटॅशियम हाडांची कॅल्शियमची कमतरता पूर्ण करू शकते. त्यामुळे अननस खूप फायदेशीर आहे.
  4. संत्रे हाडे मजबूत करण्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरते, कारण त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे, केळी मॅग्नेशियने समृद्ध असते, जे हाडे आणि दातांच्या संरचनेच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
  5. कीवी या फळात सगळ्यात जास्त कॅल्शिअम असतात. हे तुमच्या हाडांना मजबुती देतात. त्याचबरोबर ऑस्टियोपोरोसिस च्या समस्यांना देखील किवी दूर करते.