मुंबई : (Corona) कोरोना संकटात अख्खा जगाला फुफ्फुसाचे महत्त्व कळलं. कोरोनाचा विषाणू माणसाच्या श्वसनावर हल्ला करतो आणि नंतर त्याचा परिणाम (lung) फुफ्फुसावर होतो. त्यामुळे फुफ्फुसाची काळजी घेणे किती महत्त्वाची आहे हे लोकांना कळायला लागलं. वाढलेलं प्रदूषण यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास, खोकला आणि अस्थमा सारखे (Serious Illness) गंभीर आजार होत आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात आपण अजूनही काही गोष्टी करता ज्या फुफ्फुसासाठी चांगल्या नाहीत. जर या गोष्टी तुम्ही अजूनही करत असाल तर सावधान लगेचच ते करणं थांबवा. त्या कुठल्या गोष्टी आहे आज आपण जाणून घेऊयात.
कुठलंही व्यंजन हे मीठाशिवाय पूर्ण होतं नाही. जेवण्यात जराही मीठ कमी झालं तर भाजी बेचव लागते. आणि जर हेच मीठ जास्त झालं तर जेवण्याची चव खराब होते. त्यामुळे जेवण्यात मीठाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट हवं. जर आपण प्रमाणापेक्षा जास्त मीठ खालं तर ते आरोग्यासाठी चांगलं नसतं. रोज तुम्ही मिठाचं सेवन जास्त केलं तर हाड कमजोर होतात. आणि फुफ्फुसावरही त्याचा परिणाम होतो.
बदललेल्या जीवनशैलीत लोकांचा कल हा तेलकट पदार्थांकडे वळला आहे. जास्त जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे फुफ्फुसाचं नुकसान होतं. तसंच तेलकट पदार्थ वरच्यावर खाल्ल्यामुळे अनेक आजार तुम्हाला होण्याची भीती असते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी तेलकट पदार्थाला विसरा आणि हेल्दी डाएटकडे लक्ष द्या.
तसं तर डेअरी प्रोडक्ट्स हे आरोग्यासाठी चांगलं आहे असं म्हणतात. मात्र कुठल्याही गोष्टींचा अतिवापर तुम्हाला कायम नुकसान देतं. जर तुम्ही बटरचं सेवन जास्त प्रमाणात केलं तर याचा परिणाम तुमच्या फुफ्फुसावर होतो. त्यामुळे डेअरी प्रोडक्ट्सवर नियंत्रण ठेवा.
हो, हे पण तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. यामुळे फुफ्फुसाचा नुकसान होतं. त्यामुळे स्वस्थ फुफ्फुसासाठी साखरयुक्त पेयापासून दूर राहा.
स्मोकिंग फुफ्फुसाचा खूप मोठा दुश्मन आहे. स्मोकिंगमुळे होणारे नुकसान माहिती असूनही अनेक लोकं स्मोकिंग करतात. यामुळे हळुहळु त्यांचा फुफ्फुसावर वाईट परिणाम होतो. स्मोकिंगमुळे आपण स्वत:चं नुकसान करतो पण सोबत इतरांचं आयुष्य धोक्यात आणतो. म्हणून स्मोकिंगला आपल्या आयुष्यातून हद्दपार करा.
(टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा)
Immunity : ‘या’ 5 गोष्टी ठेवा चार हात लांब, नाहीतर रोगप्रतिकारक शक्तीवर होईल गंभीर परिणाम!
Makhana health benefits: सकाळी रिकाम्या पोटी मखाना खाण्याचे अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर!
Eggs in Winter: हिवाळ्याच्या हंगामात दररोजच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करा आणि निरोगी राहा!