नवी दिल्ली: हल्लीच्या तरुण पिढीमध्ये वजन कमी (weight loss) करण्याची एक क्रेझ आहे. त्यामुळे ते जिममध्ये जाणं अधिक सुरक्षित समजतात. विविध प्रकारचे व्यायामही (exercise) करतात. त्यामुळेच अनेक जण सध्या लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्या (using stairs) चढून वर जाणे पसंत करतात. तसं पाहिलं तर पायऱ्या चढण्याचा हा व्यायाम आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुमचा लठ्ठपणा (obesity) जर वाढत असेल, तर तो कमी करण्यासाठी पायऱ्या या तुमच्यासाठी एक चांगला व्यायाम ठरू शकतात. पायऱ्या चढणे हा एक असा व्यायाम आहे ज्यामुळे आपल्या खिशावर अनावश्यक भार पडत नाही. पायऱ्या चढण्याचे अनेक फायदे (benefits) आहेत, त्यामुळे फिटनेस एक्स्पर्टही हेल्दी व्यक्तीला याचा उपयोग करण्याचा सल्ला देतात. मात्र पायऱ्यांचा व्यायामासाठी वापर करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणेही गरजेचे आहे.
हेल्दीफाइमी नुसार, तुम्ही जितके जास्त काळ पायऱ्या चढण्याचा व्यायाम कराल तितकी तुमची कॅलरी बर्न होईल. पण जितक्या वेगाने तुम्ही शिडी चढण्यासाठी व्यायाम कराल, तितके तुम्ही जखमी होण्याची शक्यता जास्त असते.
म्हणून पायऱ्या चढण्याचा व्यायाम ५ ते ७ मिनिटे करा. हा व्यायाम तुम्ही आठवड्यातून तीन दिवस हे करू शकता. जेव्हा तुम्हाला या व्यायामाची सवय होईल, तेव्हा हळूहळू तुम्ही वेळ वाढवू शकता. त्यानंतर तुम्ही 7 मिनिटांऐवजी 10 ते 15 मिनिटेही हा व्यायाम करू शकता.
जिना चढण्याचा व्यायाम करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पायऱ्या जास्त दूर आणि जास्त मोठ्या असू नयेत. त्यांच्यामध्ये जास्त अंतर नसावे अन्यथा तुम्ही पडण्याचा धोका असू शकतो.
पायऱ्या चढताना एकावेळी 2 पायऱ्या चढू शकता, पण उतरताना एका वेळी एकच पायरी उतरावी. तुम्ही दिवसातून बऱ्याच वेळा हा व्यायाम करू शकता, त्याने तुमचे वजन वेगाने कमी होईल आणि पोटही बाहेर येणार नाही.
जेव्हा तुम्ही जिना अतवा पायऱ्या चढता तेव्हा तुम्हाला दम लागू शकतो, अशा वेळी दीर्घ श्वास घ्यावा. हाही एक प्रकारचा व्यायाम आहे आणि तुम्ही एका वेळी ४० ते ५० वेळा हे करू शकता. यामुळे तुमच्या पोटाची अतिरिक्त चरबी कमी होईल आणि शरीर चपळ होईल.
हाही एक प्रकारचा व्यायाम आहे. तो करताना पहिल्या पायरीवर चढताना संपूर्ण शरीराचा भार आपल्या हातावर येईल अशा पद्धतीने तोल सांभाळावा. हातांवर शरीराचा भार टाकताना हळूहळू वर-खाली करावे आणि दीर्घ श्वास घ्यावा. हा व्यायाम केल्याने पाठ आणि कंबर मजबूत होते, तसेच शरीरावरील अतिरिक्त चरबीही कमी होते.