एडिनबर्ग विद्यापीठातील एडिनबर्ग आणि येल विद्यापीठातील संशोधकांनी नुकताच युनायटेड स्टेट्समधील 374 पेक्षा जास्त प्रौढ आणि लहान मुलांच्या खाण्याच्या पसंतींचा अभ्यास (A study of food preferences) केला. अभ्यासादरम्यान, सहा ते 10 वर्षे वयोगटातील 137 मुलांना तीन सफरचंद दाखवण्यात आले. त्यांना सांगण्यात आले की, एक शेतात उगवले होते, एक प्रयोगशाळेत बनवले (made in the laboratory) गेले होते आणि दुसरे प्रयोगशाळेत झाडावर वाढले होते. संशोधकांना असे आढळले की, मुले आणि प्रौढ दोघांनीही प्रयोगशाळांमध्ये पिकवलेल्या सफरचंदांच्या तुलनेत शेतात पिकवलेल्या सफरचंदाला अधिक पसंती दिली. लक्षात आलेली चव, जाणवलेली सुरक्षितता आणि खाण्याची इच्छा या संदर्भात मुलांच्या सफरचंद प्राधान्यांचे मूल्यांकन करण्यासाठी संघाने प्रश्नावली आणि सांख्यिकीय मॉडेल्सचा (statistical models) वापर केला. वयोगटांची तुलना (Comparison of age groups) करण्यासाठी प्रौढांनी समान अभ्यासात भाग घेतला होता. अभ्यासात सहभागी झालेल्या अधिकाधिक मुलांनी शेतात पिकवलेल्या सफरचंदालाच प्राधान्य देत ते खाण्याची इच्छा प्रकट केली.
संशोधकांचे म्हणणे आहे की प्रौढांमध्ये नैसर्गिक अन्न निवडण्याची प्रवृत्ती चांगल्या प्रकारे विकसीत झाली असते. परंतु, नव्या संशोधनानुसार असे आढळून आले आहे की, लहान किंवा मध्यम वयातील मुलांनाही चव, रंग आणि पदार्थातील नैसर्गिकता ओळखता येते. अभ्यासात सहभागी मुलांनी शेतातील सफरचंद का निवडले याचा विचार केला असता, मुलांनी ताजेपणा, बाहेर राहणे आणि सूर्यप्रकाशाचा उल्लेख केला. तर, प्रौढांनी नैसर्गिकतेचा उल्लेख केला आहे. दुसऱ्या अभ्यासात, पाच ते सात वयोगटातील 85 मुले आणि 64 प्रौढांना चार वेगवेगळ्या प्रकारचे संत्र्याचा ज्यूस दाखविण्यात आला. त्यांना तीन पर्याय देण्यात आले, ज्यूस शेतात पीणे, काहीही माहिती नसणे आणि प्रक्रिया करून तयार केलेला पॅकींग ज्यूस निवडणे. यात, संशोधकांना असे आढळून आले की, रसाच्या नैसर्गिकतेवरील माहितीचा त्याच्या रेटिंगवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. अनुभवलेल्या चव, सुरक्षितता आणि उपभोग घेण्याची इच्छा यावर आधारित सहभागी अधिक नैसर्गिक पर्यायांकडे वळले.
दोन्ही अभ्यासांनी असे दर्शविले की, वयाचा परिणामावर फारसा प्रभाव पडत नाही. पाच वर्षाखालील मुले आणि वयाच्या दहाव्या वर्षी समान प्रतिसाद मिळतो. संशोधकांचे म्हणणे आहे की निष्कर्ष असे सूचित करतात की, नैसर्गिक पदार्थ चांगले आहेत असा विश्वास पाचव्या वयात किंवा त्यापेक्षाही कमी वयात स्थापित केला जाऊ शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग स्कूल ऑफ फिलॉसॉफी, सायकोलॉजी अँड लँग्वेज सायन्सेस येथील डॉ मॅटी विल्क्स म्हणाले: “एकंदरीत आम्ही पुरावे देतो की, किमान युनायटेड स्टेट्समध्ये, नैसर्गिक अन्नाला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती बालपणातच असते. हे संशोधन सामाजिकरित्या शिकवते की, नैसर्गिक गोष्टींना प्राधान्य देण्याची आपली प्रवृत्ती कशामुळे निर्माण होते यासह ही प्राधान्ये कशी तयार होतात. हे घटक समजून घेण्याच्या दिशेने हे संशोधन पहिले पाऊल असल्याचे संशोधकांचे मत आहे.