बदलत्या जीवन शैलीमुळे तसेच अनियमितपणे आहाराचे सेवन तसेच व्यायामाचा अभाव यामुळे गुडघेदुखीने अनेकजण त्रासलेले आहेत. पूर्वी साठीनंतर होणारे गुडघ्याचे दुखणे आज चाळीशीतही होताना दिसत आहे. गुडघेदुखी हा आर्थरायटिसचा म्हणजेच संधीवाताचा एक प्रकार आहे. गुडघ्याच्या आर्थरायटिसमध्ये गुडघ्याच्या ठिकाणी सूज येते आणि जीवघेण्या वेदना होतात.
उठताना आणि बसताना गुडघ्यातून कट- कट करून आवाज येत असेल आणि इतर कोणत्याही प्रकारची समस्या तुमच्या गुडघ्यांमध्ये नसेल तर तुम्ही नियमित हलका व्यायाम करून शकता. याबाबत तुम्हाला अभिनेत्री दिशा पाटनीच्या बहिणीने काही सोपे व्यायाम सांगितले आहेत, जे नियमित केले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला आरामही मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात व्यायामाचे प्रकार.
अभिनेत्री दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी ही फिटनेस फ्रीक असून ती तिच्या सोशल मीडियावर फिटनेसशी संबंधित अनेक पोस्ट शेअर करत असते. यासोबतच ती लोकांना फिट राहण्यासाठी वर्कआउटचे सल्ले देखील देत असते. जर तुम्हालाही गुडघ्यातून कट- कट करून आवाज येण्याची समस्या असेल तर खुशबू पाटनी यांनी सांगितले हे व्यायाम करून पाहा.
खुशबू पाटनीच्या सल्ल्यानुसार तुम्हाला जर चालताना त्रास होत असेल आणि उठताना – बसताना किंवा पायऱ्या चढताना व उतरताना गुडघ्यातून कट- कट करून आवाज येत असेल तर रोज बॅकवर्ड रनिंग करा. त्याचबरोबर उलटे चालण्याचा सराव करा. सरळ धावण्यापेक्षा बॅकवर्ड रनिंगमध्ये स्नायूची वेगळी हालचाल होते. त्या व्यक्तीचे गुडघे मजबूत होऊ शकतात.
गुडघे मजबूत ठेवण्यासाठी खुशबू पाटनीने खुर्चीच्या स्थितीत बसण्याचे व्यायाम करण्याचा सल्ला दिलाय. तुम्ही भिंतीच्या साहाय्याने आपली पाठ सरळ ठेऊन आणि मग थोडं दोन्ही पायांमध्ये अंतर ठेऊन खाली सरकल्यास खुर्चीप्रमाणे बसल्याची स्थिती होईल. ही स्थिती कमीत कमी 30 सेकंद ठेवा. अशाने वेदना कमी होण्यास आणि गतिशीलता सुधारण्यास मदत होऊ शकते.
खुशबूने लेग स्ट्रेचिंग करायलादेखील सांगितले आहे. लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी आणि गुडघ्याच्या सांध्याभोवती कडकपणा कमी करण्यासाठी हा व्यायाम महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय खुशबूने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आणखी दोन व्यायाम सांगितले आहेत. जर तुम्हाला अशी समस्या असेल तर नियमित हे सोपे व्यायाम करता येतात. हे व्यायाम कसे करावेत.