Hair Fall: रोज किती केस गळणे आहे नॉर्मल ? कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला ?

| Updated on: Dec 23, 2022 | 11:46 AM

बऱ्याच वेळा साधारण केसगळतीमुळेही आपण घाबरतो. पण नॉर्मल केस गळती होणे हे आपल्या शरीराच्या नैसर्गिक चक्राचा एक भाग आहे.

Hair Fall: रोज किती केस गळणे आहे नॉर्मल ? कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला ?
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – केस गळणे (hair fall) ही आता खूप सामान्य समस्या झाली आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण हे केस गळण्याच्या समस्येने त्रस्त झालेले दिसतात. केसगळतीच्या समस्या दूर व्हावी यासाठी लोक अनेक घरगुती उपाय (home remedies) करतात तर काही जण महागडे उपचारही करून घेतात. पण बऱ्याच वेळेस आपण नॉर्मल केसगळतीचा ताण देखील घेतो. खरंतर केस गळणे हे एक नैसर्गिक चक्र आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सामान्य केस तुटल्यास (hair care) काळजी करण्यासारखे काहीच नसते.

दररोज किती केस गळणं नॉर्मल आहे हे जाणून घेऊया. तसेच किती जास्त केस गळायला लागल्यावर सावध होणं गरजेचं आहे हेही समजून घेऊया. अती केसगळती झाल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेला पाहिजे.

दररोज किती केस गळणे ठरते सामान्य ?

हे सुद्धा वाचा

जर आपले केस दररोज गळत असतील तर ते पाहून आपण घाबरून जातो. पण सामान्यपणे रोज काही केस गळणे हे शरीराचे नैसर्गिक (नूतनीकरण) चक्र आहे. एका अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीचे दररोज 50 ते 100 केस गळणे हे सामान्य आहे. आपल्या केसांचे हेअर फॉलिकल हे एका चक्रातून जात असतात. त्याच्या पहिल्या टप्प्याला अॅनाजेन म्हणतात, ज्यामध्ये केसांची वाढ होते तर दुसरा टप्पा टेलोजन असतो, ज्याला रेस्ट स्टेज (विश्रांतीचा काळ) असे म्हणतात.

बहुतांश निरोगी लोकांच्या डोक्यावर 80 ते 12 हजार केस असतात. लहान केस असलेल्या लोकांच्या तुलनेत ज्यांचे केस लांब आहेत, अशा व्यक्तींचे केस जास्त केस गळतात. अनेकदा लांब केस असलेल्या लोकांचे केस धुताना किंवा कंगव्याने विंचरताना जास्त तुटतात.

डॉक्टरांकडे कधी जावे ?

जर एका वेळेस तुमचे खूप केस तुटत असतील किंवा केसांचा पुंजका हातात येत असेल तसेच टाळूवर टक्कल दिसू लागले असेल तर ही परिस्थिती काळजी करण्यासारखी असू शकते. या केसगळतीमागे आरोग्याशी संबंधित कारणे असू शकतात. अशाप्रकारे केस गळणे हे कोणत्याही धोकादायक आजाराचे प्रारंभिक लक्षण असू शकते. म्हणूनच जर केसांना नुसता स्पर्श केल्यानेही ते गळून हातात येत असतील किंवा अंगा-खांद्यावर पडलेले खूप केस दिसत असतील तर अशा परिस्थितीत वेळ न घालवता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)