आरोग्याच्या ‘या’ समस्या असतील तर रात्री दूध पिणे टाळा; फायद्याऐवजी होईल नुकसान

| Updated on: Sep 29, 2022 | 10:56 AM

तंदुरुस्त आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी दूध पिणे आवश्यक असते. दुधामध्ये कॅल्शिअमसह अनेक पोषक तत्व असतात, ज्यामुळे आपली हाडं आणि दात मजबूत राहतात. मात्र दुधामुळे आपले नुकसानही होऊ शकते.

आरोग्याच्या या समस्या असतील तर रात्री दूध पिणे टाळा; फायद्याऐवजी होईल नुकसान
आरोग्याच्या 'या' समस्या असतील तर रात्री दूध पिणे टाळा; फायद्याऐवजी होईल नुकसान
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: मजबूत हाडं (bones) ही निरोगी शरीराची निशाणी असते. त्यासाठी डॉक्टर्स आणि आहारतज्ज्ञ दूध (milk) पिण्याचा सल्ला देतात. तंदुरुस्त आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी दूध पिणे आवश्यक असते. दुधामध्ये कॅल्शिअमसह (calcium) अनेक पोषक तत्व असतात, ज्यामुळे आपली हाडं आणि दात मजबूत राहतात. मात्र दुधाचे सेवन केल्यामुळे आपले नुकसानही (side effects) होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का ? आरोग्याच्या या समस्या भेडसावत असतील तर रात्री दूध पिण्याची चूक करू नका. त्या समस्या कोणत्या हे जाणून घेऊया..

पिंपल्स:

जर तुमच्या त्वचेवर सतत पिंपल्स येत असतील तर रात्री दूध पिऊन झोपू नये. दुग्धजन्य पदार्थांमुळे तरुणांमध्ये पिंपल्सही येऊ शकतात, असे अहवालातून समोर आले आहे. बऱ्याच संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की दुग्धजन्य पदार्थ एक्झिमा खराब करू शकतात.

ॲलर्जी:

ज्या व्यक्तींना एखादी ॲलर्जी असेल तर त्यांनी दुधासारखे, डेअर प्रॉडक्टसचे सेवन कमी केले पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. ॲलर्जीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी रात्री दुधाचे सेवन तर बिलकुल करू नये. दुधामुळे त्वचा किंवा इतर भागांवर ॲलर्जीची समस्या आणखी वाढू शकते, असे मानले जाते.

हे सुद्धा वाचा

फ्रॅक्चर:

शरीराच्या कोणत्याही भागाला इजा झाली किंवा काही लागले तर हळद घातलेले दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र यामुळे हाडांचे फ्रॅक्चर देखील होऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? त्यामध्ये डी-गॅलेक्टोज नावाची साखर असते आणि त्याचे जास्त प्रमाणात सेवन केले गेल्यास हाडांना फायदा होण्याऐवजी त्यांचे नुकसानच अधिक होते.

कॅन्सर:

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांमुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. असे सांगितले जाते की, दुधात असलेले कॅल्शिअम अशा प्रकारच्या कॅन्सरला प्रोत्साहन देते. त्यामुळे दुधाच्या अतिसेवनामुळे अंडाशयाच्या कॅन्सरचा धोका वाढतो.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)