जगभरात किडनीच्या (kidney disease) आजाराचे रुग्ण वाढत आहेत. किडनी खराब झाल्यास रुग्णांना डायलिसिसचा (dialysis) आधार घ्यावा लागतो. मात्र एका संशोधनात अशी माहिती समोर आली आहे की क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) झाल्यास अनेक रुग्ण वेळेवर डायलिसिस करू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांची तब्येत (effect on health) बिघडू शकते. क्वचित हे जीवघेणेही ठरू शकते. किडनी डिसीज क्वॉलिटी ऑफ लाईफच्या अभ्यासात 2787 लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्या सर्वांनाच क्रॉनिक किडनी डिसीजचा त्रास होता.
या अभ्यासात सहभागी झालेल्या 98 टक्के लोकांना कमीत कमी एका लक्षणाचा अनुभव आला. 24 टक्के लोकांना (छातीत त्रास होणे) आणि 83 टक्के लोकांना थकवा, असा त्रास जाणवला. यापैकी 690 लोकांनी किडनी रिप्लेसमेंट थेरपी (केआरटी) सुरू केली होती, परंतु त्यापैकी 490 सहभागींचे केआरटीच्या आधीच निधन झाले. या लोकांनी किडनीच्या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही. किडनीच्या आजाराची लक्षणे गंभीर झाली की तो पेशंट क्रॉनिक किडनीच्या आजाराचा बळी ठरतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशावेळी डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट करावे लागते.
खराब लाइफस्टाइल हे किडनीच्या आजाराचे प्रमुख कारण
जीवनशैलीची गुणवत्ता खालावणे, खराब जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे किडनीचे आजार वाढत असल्याचे नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. हिमांशू कुमार यांनी सांगितले. पूर्वी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना क्रॉनिक किडनी डिसीज होत असे, मात्र लहान वयातील व्यक्तीही या आजाराला बळी पडत आहेत.
किडनीच्या आजाराची लक्षणे सुरुवातीलाच शरीरात दिसू लागतात, मात्र लोक त्याकडे लक्ष देत नाहीत, असे डॉ. कुमार यांनी स्पष्ट केले. अनेक वेळा संसर्गामुळे हा अवयव बिघडू लागतो आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास पेशंटला डायलिसिचा आधार घ्यावा लागतो. मात्र अनेक वेळा डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लान्टचा (प्रत्यारोपण) शेवटचा पर्याय शिल्लक राहतो. अशा परिस्थितीत, लोकांनी किडनीच्या आजाराच्या लक्षणांकडे लक्ष देणे आणि वेळेवर उपचार घेणे हे अत्यंत महत्वाचे ठरते.
असा ओळखा किडनीचा आजार
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, केवळ लघवीद्वारे, किडनीच्या संसर्गाचा शोध सहजपणे लावला जाऊ शकतो. यात काही लक्षणे रही दिसतात
– लघवी करताना जळजळणे
– लघवी करताना ओटीपोटात वेदना होणे.
– लघवीतून दुर्गंध येणे.
– भूक कमी होणे किंवा भूक न लागणे.
– सकाळी उठल्यावर उलट्या होणे.
– लघवीतून रक्तस्राव होणे.