नवी दिल्ली: डिप्रेशन म्हणजे नैराश्य (depression) ही आजच्या काळात सामान्य समस्या बनली आहे. केवळ मोठी माणसेच नव्हे तर काहीवेळा लहान मुलांनाही त्याचा सामना करावा लागतो. बदलते सामाजिक वातावरण, कामाचे वाढते ओझे, ताण (stress) यामुळे लोक अनेकदा नैराश्याच्या तावडीत अडकतात. परंतु त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे बरेचदा पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. नैराश्य ही अशी एक मानसिक स्थिती आहे ज्याचा लोकांच्या मनावर नकारात्मक (negative impact) परिणाम होतो.
आपल्यापैकी अनेक लोकांना कधी ना कधी कधी ना कधी नैराश्याचा सामना करावा लागला असेल. जर ते काही दिवसांसाठी असेल तर ते सामान्य आहे पण नैराश्य जर काही महिने टिकले तर ते आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. नैराश्यग्रस्त व्यक्तीच्या आरोग्यावर, संपूर्ण दिनचर्येवर त्याचा परिणाम होतो. व्हेरीवेल माइंडच्या मते, असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपण नैराश्याला सामोरे जाऊ शकतो. जाणून घेऊया काही टिप्स…
नैराश्य ग्रस्त व्यक्तीने स्वतःसाठी एक सपोर्ट नेटवर्क (पाठिंबा देणाऱ्या व्यक्ती) तयार करणे आवश्यक आहे. मित्र किंवा कुटुंबाशी मजबूत संबंध निर्माण करणे असा अर्थ काही लोकांसाठी होऊ शकतो. जेव्हा तुम्ही लोकांसोबत बराच वेळ घालवता तेव्हा ते तुम्हाला नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी मदत मिळू शकते.
ताण-तणाव हे नैराश्यासाठी अतिशय धोकादायक आहे. तणाव नेहमीच नैराश्य वाढवण्याचे काम करतो. जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन जास्त प्रमाणात तयार होते. थोड्या काळासाठी ही चांगली गोष्ट असू शकते.
कारण जेव्हा तुम्ही तणावाखाली असता, तेव्हा तुम्हाला उलट परिस्थितीशी सामना करण्यास तयार राहण्यास मदत होते. मात्र दीर्घकाळ अशी परिस्थिती राहिली, तर त्यामुळे तुमच्यासाठी नैराश्यासह अनेक समस्या उद्भवू शकतात.
चांगली आणि पुरेशी झोप आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते. रात्री पुरेशी झोप मिळाली तर दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटते आणि काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. मात्र झोप नीट पूर्ण न झाल्यास त्याचा मेंदूवर परिणाम होतो आणि त्याचा परिणाम आपल्या दिवसभरातील वागण्यावरही होतो.
अपुऱ्या झोपेमुळे कोणत्याही कामात मन लागत नाही आणि चिडचिड होते. 2014 साली झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, मेजर डिप्रेशन डिसऑर्डर असलेल्या 80% लोकांना झोपेचा त्रास होतो.
आपला आहार आणि मानसिक आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. आपल्याला दिसत नसले तरी , आपण काय खातो-पितो, याचा आपल्या मनावर आणि आरोग्यावर खूप परिणाम होतो. अनेक अभ्यासाद्वारे असे सांगण्यात आले आहे की, आपण आपले पोषण (आहार) सुधारले तर ते आपले मानसिक आजार टाळू शकतात तसेच त्यावर उपचारही करू शकतात.
आपल्या विचारांचा आपल्या मनावर सर्वात महत्त्वाचा प्रभाव असतो. आपण जसा विचार करतो, त्यानुसार आपला मेंदू प्रतिक्रिया देतो. नैराश्य हे नकारात्मक विचारांना चालना देते. त्यामुळे नकारात्मक विचारांना तुमच्या मनात स्थान मिळणार नाही, असे प्रयत्न करणे महत्वाचे ठरते.
नैराश्यामुळे आपल्याला फक्त वाईटच वाटत नाही तर ते नकारात्मक विचारांचे सर्वात मोठे कारण बनते. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरेपी ही नकारात्मक विचारांचा पॅटर्न बदलण्याचे काम करते.