नवी दिल्ली: 13 महिन्याच्या बालकाच्या वाढत्या वयासाठी आणि अॅक्टिव्हिटीसाठी त्याच्या पोषणाची आवश्यकता आहे. 13 महिन्याची मुलं अंगावरचं दूध प्यायचं बंद करून आहार घ्यायला सुरुवात करतात. काही मुलं आहार घ्यायला नकार देतात. या वयातील मुलांच्या सवयी आणि आहारात बदल होतो. त्यामुळे या मुलांचा डाएट प्लान अधिक काळजीपूर्वक तयार करावा लागतो. 13 महिन्याच्या बालकांचा आठवडाभराचा डाएट चार्च कसा असावा याबाबतचा घेतलेला हा आढावा. (know diet chart for 13 month baby)
सोमवारी त्यांना सकाळी उकडलेलं अर्ध अंड आणि एक छोटे केळ त्यांना खायला द्या. काही तासानंतर पातळ खिचडी आणि एक छोटं ग्लास दूध प्यायला द्या. दुपारी लंचमध्ये बाजरी आणि चपातीसोबत टमाट्याची भाजी आणि बेसनापासून बनवलेली भाजी द्या. संध्याकाळी एक वाटी लापशीत बदामाचे पावडर टाकून त्याला खायला द्या. रात्रीच्या जेवनात बाळाला टोमॅटो, भोपळा आणि मसूरच्या डाळीच्या सूपासह मॅश करून पुलाव द्या.
बाळाला सकाळी नाश्त्यामध्ये थेपल्यासह एक लहान ग्लास दूध द्या. काही वेळा नंतर त्याला उकडलेलं अर्ध अंड आणि एक छोटा चिकू खायला द्या. लंचमध्ये बाजरीची भाकर आणि मूग डाळीची खिचडी द्या. संध्याकाळी शेवाळ्यांचा उपमा आणि केसर-इलायची घातलेलं दूध द्या. रात्रीच्या जेवणात पालक पनीरचं पराठा खायला द्या.
बुधवारी बाळाला ब्रेकफास्टमध्ये अर्ध उकडलेलं अंड आणि अर्धी नाशपती द्या. त्यानंतर काही तासाने ज्वारी किंवा पनीरचा पराठा द्या. त्यानंतर लंचमध्ये चपाती, डाळ, भाजी आणि काकडी द्या. संध्याकाळी गहू आणि डाळीची लापशी तयार करून खायला घाला. रात्रीच्या जेवणात दही किंवा कढीसोबत व्हेजिटेबल खिचडी खायला द्या.
या दिवशी बाळाला नाश्त्यामध्ये एक कप पोहे आणि एक छोटा ग्लास संत्री ज्यूस द्या. नंतर काही वेळाने अर्ध्या अंड्याचं ऑम्लेट आणि एक ग्लास बनाना मिल्क शेक द्या. लंचमध्ये पराठ्यासह पनीर भूर्जी खायला द्या. संध्याकाळी दह्यामध्ये पोहो शिजवून मॅश केलेल्या केळीसोबत खायला द्या. डिनरमध्ये पावभाजीसह मूग डाळीचं सूप द्या.
सकाळी नाश्त्यात अर्ध उकडलेलं अंड आणि पपईचा एक तुकडा खायला द्या. काहीवेळानंतर एक वाटी ओट्स, मध आणि बादामाची लापशी तयार करून खायला द्या. लंचमध्ये व्हेजिटेबल सूपासह फ्राईड राईस आणि गाजराचे तुकडे खायला द्या. संध्याकाळी सफरचंद आणि ओट्सची स्मूदी बनवून प्यायला द्या. पुन्हा लंचमध्ये केसर, ज्वारी आणि धन्यांचा चिला दह्यासोबत खायला द्या.
सकाळी नाश्त्यामध्ये दोन छोट्या नाचणीच्या पराठ्यासह हिरवी चटणी द्या. काही वेळानंतर दोन किंवा तीन पनीर आणि अंजिराचे लाडू खायला द्या. लंचमध्ये चपाती, डाळ आणि भाजीसह काकड्यांचे तुकडे द्या. संध्याकाळी रताळे भाजून खायला द्या. रात्रीच्या जेवणात टोमॅटोसूपसह राजमाचा भात खायला द्या.
रविवारी बाळाला नाश्त्यामध्ये हिरव्या चटणीसह नाचणीचे दोन डोसे खायला द्या. काही तासानंतर अंजीर आणि पनीरचे लाडू खायला द्या. लंचमध्ये चपाती, दाळ आणि भाजीसह काकडीचे तुकडे द्या. संध्याकाळी मुलांना रताळे खायला द्या. रात्री जेवणात मुलांना टोमॅटो सूप आणि राजमाचा भात द्या. (know diet chart for 13 month baby)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 11 September 2021https://t.co/YOqfXp5vOt#SuperFastNews100 #SuperFast #FastNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 11, 2021
संबंधित बातम्या:
Health care : ‘हे’ 5 हेल्दी ड्रिंक्स तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर!
तिशीनंतर महिलांच्या शरीरातील कॅल्शियम का कमी होते?; वाचा लक्षणे आणि कारणे!
Masoor Dal Face Pack : मसूर डाळीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
(know diet chart for 13 month baby)