Health Care Tips | काय आहे चिया बियाणे, कसा कराल चिया बियाणांचा आहारात सामावेश, जाणून घ्या चिया बियाणांविषयी

| Updated on: Mar 07, 2022 | 12:09 PM

आपले मुलं निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पालकाकडून केले जातात. मुलांच्या दिनचर्येत पालकांना त्यांच्या आहाराची (diet) काळजी घ्यावी लागते. मुलांसाठी सकस आहार हा त्यांच्या वाढीसाठी आवश्‍यक असतो. त्याचबरोबर शरीर निरोगी ठेवण्यासाठी अशा गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा, ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. चिया सीड्‌सदेखील (Chia seeds) पोषक तत्वांनी समृद्ध आहेत.जाणून घेऊया चिया सीड्सविषयी.

Health Care Tips | काय आहे चिया बियाणे, कसा कराल चिया बियाणांचा आहारात सामावेश, जाणून घ्या चिया बियाणांविषयी
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : धावपळीच्या जीवनामध्ये आहाराला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातच मुलांचा आहार असला तर त्याकडे अधिकच लक्ष द्यावे लागतं. मुलांच्या वाढीच्या वयात त्यांना सर्व प्रकारची पोषक तत्व मिळावे, यासाठी पालक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात. आपले मुलं निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पालकाकडून केले जातात. मुलांच्या दिनचर्येत पालकांना त्यांच्या आहाराची (diet) काळजी घ्यावी लागते. मुलांसाठी सकस आहार हा त्यांच्या वाढीसाठी आवश्‍यक असतो. त्याचबरोबर शरीर निरोगी ठेवण्यासाठी अशा गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा, ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. चिया सीड्‌सदेखील (Chia seeds) पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. ‘साल्विया हिस्पॅनिका’ वनस्पतीपासून ते मिळवले जाते, त्याची पोषक तत्व आणि मुलांच्या आहारात करावयाचा समावेश, फायदे (benefits) याबद्दल आपण बोलणार आहोत.

हाडांसाठी महत्वपूर्ण

तुमच्या मुलाला वारंवार थकवा जाणवत असेल किंवा हाडे कमकुवत होत असतील, तर त्याला आठवड्यातून दोनदा चिया बियांपासून बनवलेल्या वस्तू खायला द्या. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि त्यांच्या विकासातही मदत होते. यामध्ये प्रथिने भरपूर असल्यामुळे चिया बिया हाडांसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. एवढेच नाही तर चिया बियाणे मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे महत्त्वाचे खनिजे देखील प्रदान करतात. हे हाडांसाठी अत्यंत आवश्यक मानले जातात.

स्मरणशक्तीसाठी उत्तम

अनेक मुलांमध्ये विसरायचा प्रकार असतो. काही सांगितलं की मुलं विसरतात. मात्र, यावर चिया सीड्‌समुळे स्मरणशक्ती उत्तम राहण्यास मदत होते. त्यावर उपाय म्हणून मुलांना ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर असलेल्या अशा गोष्टी खायला देण्याचा सल्ला दिला जातो. चिया बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. ओमेगा-3 फॅटी अॅसिड शरीरात योग्य प्रमाणात असल्यास ते मज्जासंस्था निरोगी ठेवू शकते.

प्रतिकारशक्ती वाढते

कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व प्रत्येक जण जाणतो. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांना कोरोनासह अनेक आजारांची बाधा पोहचू शकते. चिया बियांमध्ये असे अँटिऑक्सिडंट्स देखील असतात, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी प्रभावी आहेत. मुले आणि प्रौढ देखील रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चिया बियांचे सेवन करू शकतात.

असा करा आहारात समावेश

1) चिया बिया दुधात मिसळून मुलांच्या आहारात समाविष्ट करू शकतो.
2) चिया बियांची स्मूदी बनवून मुलांना नियमितपणे खायला दिले जाऊ शकते.
3) मुलांना दही खूप आवडते, त्यामुळे त्यांना दह्यात चिया बिया मिसळूनही खाऊ घालता येते.
4) मुलासाठी चिया सीड्स कुकीज देखील बनवू शकता.

दरम्यान, चिया बियांमध्ये इतके पोषक तत्व असूनही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

इतर बातम्या

वैराग्य दाखवून बगल में छुरी घेऊन फिरायचं, भाजप नेते गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर सणसणीत टीका!

Funny Video viral : ‘जय महाराष्ट्र, हरहर महादेव, जय बजरंग बली, काका, काकू, मामा, मामी…; पाळण्यात बसल्यावर मुलाला हे काय झालं?

रशियाच्या मिसाईल हल्ल्यात युक्रेनमधील रहिवासी इमारती उद्ध्वस्त