माठातील, हंड्यातील पाणी खराब होतं, मग बॉटलमधील पाणीही खराब होतं का?, प्रश्न प्रत्येकाच्या मनातील; उत्तर काय?

| Updated on: Feb 10, 2023 | 8:42 AM

एका रिपोर्टनुसार, पाणी कधीही खराब होत नाही. बाटलीवर लिहिलेल्या एक्सपायरी डेटचे कनेक्शन हे प्लास्टिकसंदर्भात असते. चला समजून घेऊ.

माठातील, हंड्यातील पाणी खराब होतं, मग बॉटलमधील पाणीही खराब होतं का?, प्रश्न प्रत्येकाच्या मनातील; उत्तर काय?
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : जेव्हा आपण बाजारातून एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्यावर लिहिलेली एक्सपायरी डेट (expiry date) आवर्जून तपासतो. घराबाहेर किंवा प्रवासात असताना तहान लागल्यास तेव्हा पाणी सोबत नसेल तर आपण पटकन पटकन पाण्याची बाटली (water bottle) विकत घेतो आणि तेच पाणी पितो. पण पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेटही लिहिलेली असते हे तुमच्या कधी लक्षात आले आहे का? जशी खाद्यपदार्थांची एक्स्पायरी डेट असते, तशीच पाणी खराब होण्याचीही तारीख असते का? तसे होत नसेल तर पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेट का लिहिली जाते? अमेरिकेत अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट लिहिणे बंधनकारक केलेले नाही. मात्र पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट नेमकी का लिहीली जाते, यामागचे कारण तज्ज्ञांनी सांगितले आहे. ते जाणून घेऊया.

पाणी खराब होत नाही

एका अहवालानुसार, पाणी कधीही खराब होत नाही. बाटलीवर लिहिलेल्या एक्सपायरी डेटचे कनेक्शन हे प्लास्टिकसंदर्भात असते. या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर फक्त पाणी साठवण्यासाठी केला जातो. खरंतर, एका ठराविक कालावधीनंतर प्लास्टिक पाण्यात विरघळू लागते. त्यामुळेच अनेक वर्षे प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी ठेवल्याने पाण्याच्या चवीवर परिणाम होऊन दुर्गंधीही येऊ शकते. साधारणपणे या बाटल्यांवर उत्पादनाच्या तारखेपासून 2 वर्षांची एक्सपायरी डेट लिहिली जाते. त्यामुळे या बाटलीत ठेवलेले पाणी हे त्या तारखेच्या आतच संपवणे योग्य ठरते.

हे सुद्धा वाचा

प्लास्टिकमुळे होणारे नुकसान

प्लास्टिक पाण्यात विरघळल्यास ते पाणी पिण्याचे काय तोटे आहेत ते जाणून घेऊया. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हॉयर्नमेंटल हेल्थ सायन्सेसच्या म्हणण्यानुसार, अनेक प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या बनवण्यासाठी बीपीए नावाचे रसायन वापरले जाते. हे रसायन आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम करू शकते. याच्या सेवनामुळे BPA रक्तदाब, टाइप-2 मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, एक्सपायरी डेटच्या तारखेपेक्षा अधिक काळ ठेवलेले पाणी वापरल्यास आपल्या आरोग्यास हानी पोहोचू शकते.

सिंगल यूज प्लॅस्टिकच्या बनवलेल्या असतात या बाटल्या

पाणी साठवण्यासाठी आणि बाजारात विकण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बाटल्या या एकदाच वापरता येतील अशा म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिकच्या बनलेल्या असतात. हे (प्लास्टिक) कमी खर्चात तयार केले जाते आणि ते रिसायकल करणे देखील सोपे असते. मात्र बऱ्याच वेळेस काही लोक या बाटल्या खूप काळ वापरत राहतात, जे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असू शकते. असे केल्याने प्लास्टिक हे बाटलीतील पाण्यात विरघळल्यानंतर शरीरात पसरते आणि त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

साधारणपणे घरांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर जास्त केला जातो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की BPA मुक्त असलेल्या किंवा स्टीलच्या बाटल्या वापरणे आणि घरात पाणी साठवण्यासाठी थंड जागेचा वापरणे करणे हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.