मुंबई : सध्याच्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये संधिवाताची (Rheumatoid arthritis) समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसते आहे. बहुतेक वेळा ही समस्या वय वर्ष 40 नंतर सुरु होत असते परंतु हल्ली बदललेली आहार पद्धती आणि बदललेली जीवनशैली (Lifestyle) यामुळे प्रत्येक जण कामांमध्ये व्यस्त असतो. कामामध्ये व्यस्त असल्याने बहुतेक वेळा आपण कधीही कोणत्याही प्रकारचा आहार सेवन करतो आणि अनेक वेळा आपल्या शरीराला (Body) आवश्यक ती पोषक तत्व सुद्धा मिळत नाहीत. शरीरामध्ये अनेकदा कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. यामुळे संधिवातसारखे दुखणे डोकेवर काढण्यास सुरूवात करतात. संधिवात म्हणजे नेमके काय, संधिवातामध्ये नेमकी कशी काळजी घ्यावी यासाठी काही खास टिप्स प्रसिध्द डाॅक्टर श्रद्धा बायस परदेशी यांनी सांगितल्या आहेत.
संधिवात- संधिवात हा ज्येष्ठ नागरिकांमध्ये किंवा 40 शीनंतर जाणवतो.
आमवात- आमवात हा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
आज 100 रूग्णांपैकी साधारण 76 टक्के लोकांना संधिवातासंदर्भात त्रास जाणवत आहे. सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अगदी कमी वयामध्ये देखील संधिवाताची समस्या निर्माण होते आहे. वंध्यत्व, थायराॅईड, संधीवात, व्हेरीकोज, व्हेन्स, अॅलर्जी आणि अस्थमा, सोरासिस, कोड, मुळव्याध, मणक्यांचे आजार आणि लैगिंक समस्या निर्माण होतात.
संधिवातची लक्षणे-
संधिवाताची अनेक लक्षणे आहेत. मात्र, प्रामुख्याने चालताना, बसताना त्रास होतो. हाडांमधून बसताना कट कट आवाज य़ेणे. खूप वेळ एकाच जागी बसले तर अचानक उठण्यास त्रास होणे. मांडी न घालता येणे, रात्री अचानक हाडे दुखणे ही आहेत. मात्र, जेंव्हा सुरूवातीला ही लक्षणे रूग्णांमध्ये दिसतात. तेंव्हा याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे संधिवाताची समस्या ही वाढतच जाते. यामुळे रूग्णांना वरील काही लक्षणे दिसली की, लगेचच डाॅक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर आहे.
सांधिवाताची कारणे
संधिवाताची अनेक कारणे आहेत. कारण जसे एखाद्या गाडीचे टायर कालांतराने खालून झिजते. तसेच आपल्या हाडांचे असते. कालांतरणाने आपल्या हाडांची झिज सुरू होते आणि मग संधिवाताचा त्रास सुरू होतो. यामुळे सांध्यांमध्ये बदल होतो. बऱ्याच वेळा इतर आजारांमुळे देखील संधिवात सुरू होते. हाडांमधून आवाज येऊ लागला किंवा चालताना किंवा बसताना हाडांमधून आवाज येत असेल की, लगेचच डाॅक्टरांचा सल्ला घेणे चांगले आहे.
संबंधित बातम्या :
Healthy Foods : उष्णतेवर मात करण्यासाठी या 5 आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा!