तुम्हालाही आवडते का Lemon Tea? आरोग्यासाठी आहे हानिकारक, आजच बंद करा!

| Updated on: Aug 10, 2023 | 11:00 AM

अनेकांना दुधाचा चहा प्यायला आवडतो, तर काही जण दुधाशिवाय ब्लॅक टी पितात. त्याचबरोबर अनेक जण ग्रीन टी पिणे चांगले मानतात तर काही लोक लेमन टी पितात. तुम्हालाही लेमन टी पिण्याचा छंद असेल तर सावध व्हा, अन्यथा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात.

तुम्हालाही आवडते का Lemon Tea? आरोग्यासाठी आहे हानिकारक, आजच बंद करा!
lemon tea
Follow us on

मुंबई: आपल्या देशात बहुतेक लोक सकाळची सुरुवात चहाने करतात. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार चहा तयार करतो. अनेकांना दुधाचा चहा प्यायला आवडतो, तर काही जण दुधाशिवाय ब्लॅक टी पितात. त्याचबरोबर अनेक जण ग्रीन टी पिणे चांगले मानतात तर काही लोक लेमन टी पितात. तुम्हालाही लेमन टी पिण्याचा छंद असेल तर सावध व्हा, अन्यथा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात.

लेमन टी (लिंबू चहा) प्यायल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते

खरं तर, चहाची पाने आणि लिंबू दोन्हीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ लघवीच्या माध्यमातून बाहेर पडतात. त्यानुसार हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण यासोबतच शरीराला अनेक दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते. यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया लिंबू चहा पिण्याचे दुष्परिणाम काय आहेत.

बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लिंबू चहा प्यायल्याने शरीरात ॲसिडची पातळी वाढू शकते. ज्यामुळे चयापचयात अडथळा येऊ शकतो. यामुळे शरीरात डिहायड्रेशन, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

दात आणि हिरड्यांशी संबंधित समस्या

लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात ॲसिड असतं. अशावेळी चहा आणि लिंबू एकत्र सेवन केल्यास शरीरातील ॲसिडची पातळी वाढते. ज्यामुळे दात आणि हिरड्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

हाडांसाठी विषासारखे काम

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा लिंबू चहामध्ये मिसळले जाते तेव्हा ते हाडांसाठी विषासारखे काम करते. असे केल्याने ते शरीरात असलेले ॲल्युमिनियम शोषून घेते, ज्यामुळे शरीर हळूहळू कमकुवत होते.

पचत नसलेले अन्न

चहामध्ये लिंबाचा रस मिसळल्याने शरीराची पचनक्रिया मंदावते. असे केल्याने बद्धकोष्ठता, पोटात जळजळ, ॲसिडिटी सारख्या समस्या सतावू लागतात. तसेच खाल्लेले अन्न सहज पचत नाही.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)