हळदीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये संजीवनी असे म्हणण्यात आले आहे. हळद आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध होणारी एक औषधी वनस्पती आहे त्याचबरोबर हा एक मसाल्याचा पदार्थ सुद्धा आहे आणि म्हणूनच जेवणाची चव वाढवण्यासाठी अनेकदा हळदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कोरोनाच्या (Corona) काळामध्ये अनेकदा हळदीचा उपयोग काढा बनवण्यासाठी वारंवार केला जात आहे. ही औषधी वनस्पती आहे.या वनस्पतींच्या वापराने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती (Immunity) दुप्पट होते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील अनेक आजार सुद्धा दूर करते. हळदीचे आपल्या आरोग्यासाठी अनेक उपयोग आहेत परंतु हळद आपल्या त्वचेसाठी सुद्धा अत्यंत फायदेमंद मानली जाते. आपल्यापैकी अनेक जण आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दुधामध्ये हळद टाकून याचे सेवन करत असतात. परंतु हळदीचे दूध जसे उपयुक्त आहे त्याच बरोबर हळदीचे पाणी सुद्धा आपल्या शरीरासाठी लाभदायक आहे. अनेकांना हळदीचे पाण्याबद्दल फायदे माहिती नाहीत. तुम्ही हळदी युक्त पाणी बनवण्यासाठी फ्रेश हळद किंवा हळदीचे पावडर (Turmeric powder) सुद्धा वापरू शकता. सुरुवातीला हळदीचे पाण्याची तुम्हाला चव लागणार नाही परंतु जशी जशी तुम्हाला सवय होईल त्या पद्धतीने तुम्हाला हे पेय आवडू लागेल.
हळदीमध्ये करक्यूमिन नावाचे एंटी इंफ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते यामध्ये उपलब्ध असणारे एंटीऑक्सीडेंट गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील पेशी मजबूत बनतात. चला तर मग जाणून घेऊया हळदीच्या पाण्याचे आपल्या आरोग्यासाठी नेमके काय काय फायदे आहेत त्याबद्दल…
हळदीमध्ये उपलब्ध असणारे करक्यूमिन नावाचे घटक असल्यामुळे आपल्या शरीरातील इम्युनिटी सिस्टम वाढवण्यासाठी मदत करत असतात. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीचा काढा बनवून पितात. त्याचबरोबर या कार्याचे करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. एवढेच नाही तर हळदी युक्त पाणी सुद्धा योग्य मात्रा मध्ये सेवन करणं आवश्यक आहे.
तुमच्या शरीरातील एखाद्या प्रभावी जागेवर वारंवार वेदना होत असतील तर अशा वेळी हळदी युक्त पाणी सेवन करणे तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते हळदीच्या पाण्यामध्ये उपलब्ध असणारे अँटिऑक्सिडंट विषाणूंना नष्ट करतात आणि तुम्हाला वेदनेपासून मुक्तता मिळते.
जर तुम्ही नियमितपणे योग्य मात्रेत हळदी युक्त पाणी सेवन केले तर त्यामुळे तुमची त्वचा सुद्धा चांगली राहते. तुमच्या शरीरावर व त्वचेवर कोणत्याही प्रकारच्या मृतपेशी असतील तर त्या निघून जातील आणि तुमची त्वचा अगदी नैसर्गिक रित्या उजळू लागेल.
सध्या प्रत्येकाचे जीवन बदलले आहे आणि बदललेली लाइफस्टाइल आणि बिझी शेड्युलमुळे अनेकांना पोटाच्या संदर्भातील समस्या त्रास देत असतात ,अशावेळी पोटाशी निगडित असलेल्या प्रत्येक समस्येवर म्हणजेच ऍसिडिटी, पोटामध्ये दुखणे,गॅस होणे , बद्धकोष्टता यासारख्या समस्या उद्भवत असतात त्याचबरोबर या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला पाहिजे याशिवाय काही घरगुती उपचार याच्या साह्याने तुम्ही तुमच्या पोटाचे आरोग्य चांगले ठेवू शकतात.जर तुम्ही नियमितपणे हळदी युक्त पाणी सेवन केले तर तुमची पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करू लागते आणि पोटाशी निगडित असलेल्या समस्या लवकरच दूर होतात.
टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
Beauty care tips : त्वचेच्या आरोग्यासाठी कच्चे दूध आहे गुणकारी, जाणून घ्या फायदे
Pregnancy : गरोदरपणात आई आणि बाळासाठी विशेषतः महत्वाचे असलेले 6 पोषक घटक जाणून घ्या!
जेवण झाल्यानंतर तुम्हालाही थंडी वाजते, शरीर कंप होते?; जाणून घ्या त्यामागची वैज्ञानिक कारणे