वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. आपल्या शरीराला काहीही नुकसान होऊ नये म्हणून काही वेळा आपण अनेक घरगुती उपाय करून पाहत असतो. अनेकदा काही लोक सकाळी उठून लिंबू पाण्याचं नियमित सेवन करतात, वजन करण्यासाठीच त्यांचा हा खटाटोप असतो. तर काहीजण वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफीचे देखील घेतात. अशा घरगुती उपायांच्या मदतीने शरीरातील चरबी लवकर कमी होण्यास मदत होते, असं मानलं जातं. त्यामुळे हे फंडे वापरले जातात.
तर एकीकडे वजन कमी करण्याच्या नादात घरगुती उपाय केल्यानंतर पचनाच्या समस्येला सामोरे जावे लागते. या उपायांमवुळे पोटात गॅस तयार होणे, सूज येणे आणि खूप अस्वस्थ वाटणे, अशा समस्या अनेकांच्या बाबतीत दिसून येतात. एका खास ड्रिंकने शरीरारातील चरबी कमी केली जाते हे तुम्हाला माहीत आहे का? हे ड्रिंक रामबाण औषधापेक्षा काही कमी नाहीये. लोकं त्याला देसी फॅट कटर ड्रिंक असेही म्हणतात. हे एका विशेष बियांपासून तयार केले जाते. या बियांचा वापर मसाल्यात देखील केला जातो. या बियांचे पाणी आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि चरबी कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते.
जर तुम्ही रोज सकाळी हे खास ड्रिंक पिण्यास सुरुवात केली तर तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल. ते आपल्याला कृत्रिम पूरक आहारांपेक्षा चांगले परिणाम देतात. आता प्रश्न असा पडतो की, असा कोणता हा उपाय आहे, ज्याचे पाणी वजन कमी करण्यासाठी इतके प्रभावी ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊयात.
आपण बऱ्याचदा पाहिले असेल की लोकं जेवणानंतर एक चमचा बडीशेपचे सेवन करतात. याशिवाय काही लोकं माउथ फ्रेशनर म्हणूनही बडीशेप खातता. पण जेवणानंतर बडीशेप चावून खाल्ल्याने अनेक चमत्कारिक फायदे होतात. बडीशेपमुळे अन्नाचे पचन चांगले होण्यास मदत होते आणि चयापचय क्रिया सुधारते. पण तुम्हाला माहीत आहे का, जर तुम्ही एक चमचा बडीशेप पाण्यात उकळून पित असाल तर वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी बडीशेप पाण्यात उकळून पिणे रामबाण उपायापेक्षा कमी नाही असं सांगितलं जातं. बडीशेप कुठेही मिळते. शिवाय ती स्वस्त आहे. अवघ्या 5 ते 10 रुपयात किराणा दुकानातून तुम्ही बडीशेप घेऊ शकता.
जर तुम्ही देखील वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर याचा आहारात समावेश करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर या पाण्याचे सेवन करा. तसेच तुम्ही हे पाणी एकदा उकळून देखील घेऊ शकता. त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यावर त्यात लिंबाचा रस मिक्स करून त्याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर ठरते. फक्त सकाळीच नाही तर जेवणानंतर या पाण्याचे सेव्हन तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमची पचन क्रिया देखील सुधारेल आणि वजन कमी करण्यास मदत होईल.
नियमितपणे तुम्ही जर बडीशेपचे पाणी प्यायल्याने शरीरातील घाण साफ होण्यास मदत होते. तसेच शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते. म्हणूनच याला नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक म्हणतात. अशा प्रकारे पचनसंस्था योग्य राहते आणि शरीरात अतिरिक्त चरबी तयार होण्यापासून रोखते. यात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मुक्त रॅडिकल्सला निष्प्रभ करतात.