मुंबई : प्रदूषण हा भारतातील कळीचा मुद्दा असला तरी त्याकडे नेहमीच दुय्यम समस्या म्हणून दुर्लक्ष होत आले आहे. प्रदूषण हा फक्त शाळेत मुलांना निबंध लिहिण्यापूर्ताच मर्यादीत विषय राहिलाय काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. याला कारण म्हणजे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसत नाही. वाढत्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणार्या दुष्परिणामांना वेळीच आळा घातला नाही तर, भविष्यात याचे अधिक गंभीर परिणाम होउ शकतात. हिवाळ्यातील हवेचे प्रदूषण (Air pollution) व उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे याचा आरोग्यावर परिणाम होत असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रदूषणामुळे दमा (asthma) तसेच कर्करोगासारखे (cancer) जीवघेणे आजार वाढू शकतात. वाढत्या हवेच्या प्रदुषणामुळे वर्षाला लाखो लोक प्रभावित होत असता. यामुळे फुफ्फुस, किडनी, ह्रदय आणि सीपीओडीशी संबंधित गंभीर आजार होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज बनली आहे.
दरम्यान, आकाश हेल्थकेअर, द्वारकाच्या इंटरनल मेडिसीन विभागाच्या डॉ. परिणीता कौर सांगतात, की कर्करोग व दमा तसेच ह्रदयाशी संबंधित आजार हे प्रदूषणामुळे जास्त वाढले आहेत. ज्या पध्दतीने देशाची लोकसंख्या वाढत आहे, त्यापेक्षा अधिक नवनवीन आजारांची निर्मिती होत आहे. दरवर्षी 1.3 कोटी लोक खराब पर्यावरणीय आजारांमुळे मृत्यूमुखी पडत आहे. हवेच्या प्रदूषणासोबतच पाण्याचे होत असलेले प्रदूषणदेखील एक चिंतेचा विषय आहे. याला वेळीच आवर न घातल्यास याची मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचेही डॉ. कौर यांनी सांगितले.प्रदूषणाला कमी करण्यासाठी आपण आपल्या रोजच्या काही सवयींमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. भारत 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन मिळवण्यासाठी कटीबध्द असून जेव्हा सरकार व जनता सोबत मिळून यावर काम करतील तेव्हाच हे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुलचंद रुग्णालयाच्या पल्मोनरी विभागाचे डॉ. भगवान मंत्री यांनी सांगितले, की प्रदूषणाचा लोकांच्या आरोग्यावर खूप मोठा फरक पडत असतो. सध्या प्रदूषण कमी असल्याने फुफ्फुसाशी संबंधित आजार असलेले रुग्णदेखील कमी आहेत. परंतु हिवाळ्यात जेव्हा प्रदूषणात वाढ होते तेव्हा मोठ्या संख्येने रुग्णवाढदेखील होत असते. गेल्या वेळी धू्म्रपान करत नसलेल्या लोकांमध्येही फुफ्फुसाशी संबंधित आजारांमध्ये मोठी वाढ दिसून आली होती. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हवेचे प्रदूषण सांगण्यात येत होते.
इतर बातम्या
Maha Minister: 11 लाखांच्या पैठणीवरून वाद; आदेश बांदेकरांना नेटकरी म्हणाले, “ही साडी नेसून..”
कोल्हापूरचे कडवट शिवसैनिक कधीही काँग्रेसला मतदान करणार नाहीत – Pravin Darekar