पावसाळ्यात मलेरिया, झिका आणि डेंग्यू (Zika and dengue) या डासांमुळे होणाऱ्या आजारांनी ग्रासलेली व्यक्ती शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत होते. या प्रकारच्या आजारावर उपचार करूनही, त्यामुळे निर्माण झालेल्या अशक्तपणातून बरे होण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे या आजारांना बळी पडू नये म्हणून डासांपासून स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे ठरते. पावसाळ्यात डासांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढते. याचे कारण या हंगामात ठिकठिकाणी खड्डे, नाल्यांमध्ये घाण पाणी साचते. त्यामुळे डासांची पैदास होते. या हंगामात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात डासांपासून संरक्षण (Protection from mosquitoes) करणे अत्यंत गरजेचे आहे. लोक डासांपासून बचाव करण्यासाठी फवारणी किंवा इतर कीटकनाशके वापरत असले तरी, यामुळे अनेकांना अॅलर्जी होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत अशा काही वनस्पती (plant) घराभोवती लावता येतात, जे तुमच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ करतात. ही झाडे दारात किंवा बाल्कनीमध्ये लावल्यास डासांना घरात प्रवेश करण्यापासून मोठ्या प्रमाणात रोखण्यास मदत होईल. ही झाडे डासांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त मानली जातात.
कडुलिंब हे कीटकनाशक मानले जाते. पूर्वीच्या काळी लोक कडुलिंबाची पाने जाळून डास आणि किडे घालवत असत. याशिवाय कडुलिंबाचे तेलही वापरले जाते. घरात डासांचा प्रवेश रोखायचा असेल तर दारात किंवा बाल्कनीत कडुलिंबाचे रोप लावा. घरात जागेची अडचण असेल तर कुंडीत लावू शकता.
ही अशी वनस्पती आहे जी डासांना दूर ठेवण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय मानली जाते. काही मॉस्किटो रिपेलेंट क्रीम आणि रेपेलंटमध्येही याचा वापर केला जातो. ही वनस्पती डेंग्यू पसरवणाऱ्या डासांपासून संरक्षण करण्यास सक्षम असल्याचे मानले जाते.
तुम्हाला कोणत्याही रोपवाटिकेतून रोजमेरीचे रोप सहज मिळेल. या वनस्पतीमध्ये येणाऱ्या फुलांचा वास खूप तीव्र असतो. या वासाने डास पळून जातात. तुम्हाला हवे असल्यास त्याची फुले घरच्या घरी कीटकनाशक म्हणूनही वापरता येतात. त्यासाठी त्याची फुले काही तास पाण्यात भिजवून ठेवावीत, जेणेकरून फुलांचा वास आणि सार पाण्यात येईल. त्यानंतर पाणी शिंपडावे.
तुळशी ही अशी वनस्पती आहे जी बहुतेक घरांमध्ये आढळते. घराच्या बाल्कनी किंवा मुख्य दरवाजा, खिडकीच्या आजूबाजूला ठेवल्यास ती जागा स्वच्छ होईल आणि डासांच्या प्रवेशावर नियंत्रण येईल. याच्या वासामुळे डासही घरापासून दूर राहतात.
पुदिन्याच्या पानांसारखी दिसणारी ही वनस्पती उन्हात आणि सावलीत वाढू शकते. हे कीटकनाशकापेक्षा अधिक प्रभावी मानले जाते. हे रोप तुम्ही घराच्या अंगणात, बाल्कनीत तसेच घराच्या आत ठेवू शकता. डासांव्यतिरिक्त, हे इतर कीटक आणि कोळ्यांपासून संरक्षण करण्यास मदत करेल.
या वनस्पतीमध्ये कीटकनाशक गुणधर्म देखील आहेत. त्यात हलकी निळी आणि पांढरी फुले येतात, ज्याचा वास खूप तीव्र असतो. या वासाच्या प्रभावामुळे डास आजूबाजूला येत नाहीत. तुम्ही त्याची फुले पाण्यात भिजवून ते पाणी घरी शिंपडू शकता.