Malaria cases decline in India: आरोग्य क्षेत्रातून एक चांगली बातमी आहे. भारताने मलेरियाचा प्रादुर्भाव आणि या आजारामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यात यश मिळवले आहे. भारतात या आजाराचे प्रमाण 69 टक्क्यांनी कमी झाले आहे. मात्र, इतक्या झपाट्याने हा आजार कमी कसा झाला, याविषयी जाणून घेऊया.
जागतिक मलेरिया अहवालात बुधवारी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. अहवालानुसार, भारतात मलेरियाचे रुग्ण 2017 मध्ये 6.4 दशलक्ष होते ते 2023 मध्ये 20 लाखांवर आले आहेत. याच कालावधीत मलेरियाच्या रुग्णांमध्ये सुमारे 70 टक्के घट झाली असून मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 69 टक्के घट झाली आहे. हा अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. यामध्ये अनेक देशांची आकडेवारी जाहीर केली जाते. भारतात मलेरियाचे रुग्ण कमी होण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत चांगले आहे.
जागतिक मलेरिया कार्यक्रमाचे संचालक डॉ. डॅनियल मदंडी म्हणाले की, मलेरियाचे रुग्ण कमी करण्यासाठी भारताने चांगले काम केले आहे. भारताव्यतिरिक्त लायबेरिया आणि रवांडासारख्या देशांमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली आहे.
आजार नियंत्रणात कसा आला?
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या रोग निर्मूलन विभागाचे प्रमुख डॉ. रजनीकांत श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्टेमिसिनिन आणि लाँग अॅक्टिंग कीटकनाशक यांच्या कॉम्बिनेशन मेडिसिनमुळे भारतात या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.
या थेरपीचा फायदा म्हणजे आर्टेमिसिनिन प्रथम एका प्रथिनेवर हल्ला करून मलेरियाचे जीवाणू नष्ट करते आणि दुसरे औषध उर्वरित जीवाणूनष्ट करते. कॉम्बिनेशन मेडिसिनच्या मदतीने मलेरिया आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश येते. या मदतीने या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही कमी होण्यास मदत झाली आहे.
मलेरियाचा प्रसार कसा होतो?
मलेरिया हा डासांच्या चाव्यामुळे होतो. हा संक्रमित मादी अॅनोफिल्सद्वारे पसरतो. जेव्हा संक्रमित डास एखाद्या व्यक्तीला चावतो तेव्हा त्याला मलेरिया होतो. मलेरियाच्या चाव्यामुळे ताप, अंगदुखी सारख्या समस्या उद्भवतात.
काही प्रकरणांमध्ये, हे खूप गंभीर देखील असू शकते. गेल्या काही वर्षांपासून भारतात मलेरियाचे रुग्ण सातत्याने कमी होत आहेत. आता जागतिक मलेरिया अहवालानेही याला दुजोरा दिला आहे.
मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 69 टक्के घट झाली आहे. यावरुन मलेरियाचा प्रादुर्भाव आणि या आजारामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यात भारताला यश आल्यानं एक प्रकार या आजारापासून दिलासाच मिळाला आहे, असं म्हणता येईल.