दिल्लीत : दिल्लीत (Delhi) मंकीपॉक्सचा (Monkeypox) पहिला रुग्ण (patient)आढळून आला आहे. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेकडून माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जो व्यक्ती मंकीपॉक्स पॉझिटिव्ह आढळून आला आहे, त्याने परदेशी प्रवास केल्याची कोणतीही नोंद नाहीये. संबंधित रुग्णाला दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलजेमध्ये दाखल करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. ज्या रुग्णाचा अहवाल हा मंकीपॉक्स पॉझिटिव्ह आढळून आला आहे, त्याचे वय अंदाजे 31 वर्ष इतके आहे. या रुग्णाला ताप आणि त्वचेच्या जखमांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णावर आता दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णाने कुठेही परदेशात प्रवास केला नसल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीला ताप होता, तसेच त्याच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. त्यामुळे त्याची मंकीपॉक्सची देखील टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दिल्लीमध्ये मंकीपॉक्सची ही पहिलीच केस असल्यामुळे खळबळ उडाली आहे. या रुग्णाचे वय अंदाजे 31 वर्ष असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा व्यक्ती कुठेही परदेशात गेल्याची नोंद नाहीये.
Man from Delhi without any history of foreign travel tests positive for Monkeypox virus: Official sources
— Press Trust of India (@PTI_News) July 24, 2022
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात ‘डब्ल्यूएचओ’ने जारी केलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्स पॉझिटिव्ह व्यक्तीमध्ये् ताप, डोकेदुखी, थकवा, पाठदुखी, तसेच शरीराच्या काही भागांवर पुरळ येणे अशी लक्षणे असतात. व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्यानंतर सामान्यपणे पुढील सहा दिवसांच्या नंतर त्याच्यामध्ये ही लक्षणे जाणून लागतात. मंकीपॉक्सचा प्रसार हा संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याच्या संपर्कातून होऊ शकतो. हा रोग सक्रमित व्यक्तीच्या अंगावर असलेल्या जखमा, खोकला किंवा शिंक याद्वारे देखील पसरतो. या रोगावर सद्या तरी निश्चित असे औषध नाही.