Home Remedies : मळमळची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ नैसर्गिक घरगुती उपाय ट्राय करा!

| Updated on: Oct 07, 2021 | 7:34 AM

अनेक वेळा पोटदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. या दरम्यान बऱ्याच वेळा मळमळ देखील होते. यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवस बाथरूममध्ये घालवावा लागतो. मळमळीमुळे शारीरिक थकवा जाणवतो. मळमळ होण्याचे विशिष्ट असे कोणतेही कारण नाहीये.

Home Remedies : मळमळची समस्या दूर करण्यासाठी हे नैसर्गिक घरगुती उपाय ट्राय करा!
मळमळची समस्या
Follow us on

मुंबई : अनेक वेळा पोटदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. या दरम्यान बऱ्याच वेळा मळमळ देखील होते. यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवस बाथरूममध्ये घालवावा लागतो. मळमळीमुळे शारीरिक थकवा जाणवतो. मळमळ होण्याचे विशिष्ट असे कोणतेही कारण नाहीये. मोशन सिकनेस, अॅसिड रिफ्लक्स, अपचन किंवा मॉर्निंग सिकनेसमुळे देखील मळमळ होऊ शकते. मळमळ टाळण्यासाठी आपण नैसर्गिक उपाय अवलंबले पाहिजेत.

पुदीना

ताज्या पुदिन्याची पाने चावून मळमळ दूर होण्यास मदत होते. पुदिन्याची चव ताजी आणि थंड असते, जी पोट शांत करण्यास मदत करते.

आले

आले पोटातील जळजळ कमी करण्यास मदत करते. उलट्या कमी करण्यासाठी, पाण्यात आले बारीक करून प्यावे.

नारळ पाणी

नारळाचे पाणी अत्यंत पौष्टिक आहे. याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. एक कप नारळ पाण्यात 1 चमचे लिंबाचा रस मिसळा आणि प्या. यामुळे मळमळ कमी होण्यास मदत मिळते.

लवंग

लवंग आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच मळमळ टाळण्यासाठी लवंग उपयुक्त आहे. लवंगचा सुगंध आणि चव उलट्या थांबवू शकते.

बडीशेप

बडीशेप जेवणानंतरचे माउथ फ्रेशनर म्हणून लोकप्रिय आहे. यात शरीराला लाभ देणारे पोषक घटक आहेत. बडीशेप चघळल्यावर मळमळ होण्याची समस्या दूर होते.

वेलची

वेलची मळमळ हाताळण्यास मदत करते. वेलचीचे दाणे चघळल्याने मळमळ कमी होते. मध आणि वेलचीसोबत घेतल्यावर देखील मळमळची समस्या दूर होते.

लिंबूपाणी

लिंबाच्या रसामध्ये न्यूट्रलाइझिंग अॅसिड असते. जे बायकार्बोनेट तयार करतात. बायकार्बोनेट मळमळ दूर करण्यात मदत करतात. म्हणून, लिंबू पाणी केवळ उलट्यापासून आराम देत नाही तर शरीराला निर्जलीकरण होण्यापासून प्रतिबंधित करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Natural home remedies that can relieve nausea)