नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत अल्पशी घट झाली. कालच्या दिवसात देशात 13 हजार 58 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. गेल्या 231 दिवसातील ही एका दिवसात सापडलेली सर्वात कमी कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या आहे. तर 164 कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या आता दोन लाखांच्या आत आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 13 हजार 58 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 164 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 19 हजार 470 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 40 लाख 94 हजार 373 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 34 लाख 58 हजार 801 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 52 हजार 454 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 1 लाख 83 हजार 118 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 98 कोटी 67 लाख 69 हजार 411 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 13,058
देशात 24 तासात डिस्चार्ज – 19,470
देशात 24 तासात मृत्यू – 164
एकूण रूग्ण – 3,40,94,373
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 1,83,118
एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,34,58,801
एकूण मृत्यू – 4,52,454
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 98,67,69,411
गेल्या 24 तासातील लसीकरण –
India reports 13,058 new COVID cases (lowest in 231 days), 19,470 recoveries& 164 deaths in last 24 hrs as per Health Ministry
Total cases: 3,40,94,373
Active cases: 1,83,118 (lowest in 227 days)
Total recoveries: 3,34,58,801
Death toll: 4,52,454Total Vaccination: 98,67,69,411 pic.twitter.com/Ep6ZPnkshZ
— ANI (@ANI) October 19, 2021
संबंधित बातम्या :
मुंबईकरांसाठी आजच दसरा दिवाळी, एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही, संक्रमणाचा रेटही घटला