नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 3 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात देशात 15 हजार 786 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 231 कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या आता पावणेदोन लाखांच्या आत आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 15 हजार 786 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 231 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 18 हजार 641 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 41 लाख 43 हजार 236 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 35 लाख 14 हजार 449 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 53 हजार 42 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 1 लाख 75 हजार 745 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 100 कोटींच्या वर गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 15,786
देशात 24 तासात डिस्चार्ज – 18,641
देशात 24 तासात मृत्यू – 231
एकूण रूग्ण – 3,41,43,236
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 1,75,745
एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,35,14,449
एकूण मृत्यू – 4,53,042
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या –
गेल्या 24 तासातील लसीकरण –
भारत में पिछले 24 घंटों में कोरोना वायरस के 15,786 नए मामले आए, 18,641 रिकवरी हुईं और 231 लोगों की कोरोना से मौत हुई। #COVID19
कुल मामले: 3,41,43,236
सक्रिय मामले: 1,75,745
कुल रिकवरी: 3,35,14,449
कुल मौतें: 4,53,042 pic.twitter.com/sGdKVkLGta— ANI_HindiNews (@AHindinews) October 22, 2021
संबंधित बातम्या :
मुंबईकरांसाठी आजच दसरा दिवाळी, एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही, संक्रमणाचा रेटही घटला