नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 10 हजारांनी घट झाली. कोरोना ओसरत असल्याचं आशादायक चित्र पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात 29 हजार 689 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तब्बल 132 दिवसांनी म्हणजेच जवळपास चार महिन्यांनी नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 30 हजारांच्या खाली गेला आहे. त्यासोबतच अॅक्टिव्ह केसेसही चार लाखांच्या खाली आल्या आहेत. कालच्या दिवसात 415 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 29 हजार 689 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 415 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 42 हजार 363 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 14 लाख 40 हजार 951 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 6 लाख 21 हजार 469 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 21 हजार 382 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 98 हजार 100 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 44 कोटी 19 लाख 12 हजार 395 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 29,689
देशात 24 तासात डिस्चार्ज – 42,363
देशात 24 तासात मृत्यू – 415
एकूण रूग्ण – 3,14,40,951
एकूण डिस्चार्ज – 3,06,21,469
एकूण मृत्यू – 4,21,382
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,98,100
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 44,19,12,395
गेल्या 24 तासातील लसीकरण – 66,03,112
India reports 29,689 fresh COVID cases, 42,363 recoveries, and 415 deaths in the past 24 hours
Active cases: 3,98,100
Total recoveries: 3,06,21,469
Death toll: 4,21,382Total vaccination: 44,19,12,395 pic.twitter.com/mtsHnb4tjb
— ANI (@ANI) July 27, 2021
संबंधित बातम्या :
लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना बाहेर फिरण्याची परवानगी मिळणार?132
(New 29689 Corona Cases in India in the last 24 hours)